सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सातारा - सातारा जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शौचालय व घरकुल योजनेचे अनुदान देण्याच्या बहाण्याने भंडारी यांनी त्यांच्या घरी बोलावले आणि बलात्कार केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

गेल्या ४-५ महिन्यापासून याबाबत संबंधित महिला पोलिसात तक्रार देत होती पण त्याबाबत टाळाटाळ होत होती. आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सातारा इथे येऊन सोक्षमोक्ष लावण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार रात्री उशिरा शहर पोलिसांनी भंडारी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद केला.

Web Title: satara news rape case crime