भोंदूबाबाकडून विवाहितेवर बलात्कार

प्रवीण जाधव
बुधवार, 17 जानेवारी 2018

फोटो व व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत अत्याचार; मुलांचाही केला छळ

सातारा : दैवीशक्तीच्या जोरावर भुतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने बलात्कार करुन सातत्याने अत्याचारप्रकरणी भोंदूबाबा हैदरअली शेखवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडण्याबरोबरच तिच्या दोन मुलांचा छळ करण्याण्याबरोबच 29 तोळ्यांचे सोनेही काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे अनेक महिलांवर भोंदूबाबाने अत्याचार केल्याचा दावा संबंधीत महिलेने केला आहे.

फोटो व व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत अत्याचार; मुलांचाही केला छळ

सातारा : दैवीशक्तीच्या जोरावर भुतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने बलात्कार करुन सातत्याने अत्याचारप्रकरणी भोंदूबाबा हैदरअली शेखवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडण्याबरोबरच तिच्या दोन मुलांचा छळ करण्याण्याबरोबच 29 तोळ्यांचे सोनेही काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे अनेक महिलांवर भोंदूबाबाने अत्याचार केल्याचा दावा संबंधीत महिलेने केला आहे.

पुण्यातील माय-लेकींवर बलात्काराच्या गुन्ह्यात भोंदबाबा हैदरअली अब्दुलरशिद शेख अटकेत आहे. त्याच्याविरुद्ध आज आणखी एक तक्रार दाखल झाली. याबाबत संबंधीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 1996 मिरज येथील एकाशी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिला दोन मुले झाली. मात्र, 2000 साली ती वारंवार आजारी पडू लागली. डॉक्‍टरांकडे जाऊनही फरक पडत नव्हता. काही दिवसांनी ती उपचारासाठी साताऱ्यात आली. भावाने तिला गुरूवार पेठेत राहणाऱ्या मांत्रिक हैदरअली अब्दुलरशिद शेख याच्याकडे नेले. तिला भुताची बाधा झाली आहे. उतरवायला लागेल असे सांगून त्याने तिच्या भावाला दोन तास बाहेर पाठविले. त्यानंतर मंतरलेले पाणी तिला प्यायला दिले. त्यामुळे तिला ग्लानी आली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ शुटींग व फोटोही काढले. काही वेळाने संबंधित महिला शुद्धीवर आली. त्या वेळी बलात्कार झाल्याचे कोणाला सांगितल्यास फोटो व व्हिडीओ पती व भावाला दाखविण्याची धमकी दिली. त्याच्याच जोरावर त्याने तीच्यावर वारंवार बलात्कार केला.

दरम्यानच्या काळात भोंदूबाबाने महिलेचा पती व भावाशी मैत्री केली. पतीबरोबर साताऱ्यात कपड्याचे दुकानही सुरू केले. त्याच्या फ्लॅटच्या वरचा फ्लॅट त्याला घ्यायला लावला. पती दुकानात गेल्यावर तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्यानंतर त्याने पती- पत्नीत वाद घडवून आणला. संबंधित महिला व पती तयार नसताना दोघांना घटस्फोट घ्यायला भाग पाडले. त्यानंतर तिच्या भावाला तयार करून तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने तिच्याकडे असलेले 29 तोळे सोने काढून घेतले. त्यानंतर भोंदूबाबाने संबंधित महिलेला गुलामासारखी वागणूक दिली. पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांचाही तो छळ करत होता. मात्र, त्याच्या धमक्‍या व दैवीशक्तीच्या भितीने ती गप्प होती.
काही दिवसांपूर्वी भोंदूगिरीतून पुण्यातील माया-लेकींवर बलात्कार केल्याचा गुन्हा हैदरअलीवर दाखल झाला. त्यामुळे तिने मनाची तयारी करून सर्व त्रासाबाबत भावाला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतरशहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली गेली.

अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय
हैदरअली शेखने दैवीशक्ती असल्याच्या बतावण्या करून भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केला असल्याचा दावा संबंधित महिलेने फिर्यादीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांनी सखोल तपास करून हैदरअलीच्या कारवायांचा पोलखोल करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: satara news rape in women