...'त्या' पाऊल वाटांवरून कोणीही व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो

sahyadri tiger reserve
sahyadri tiger reserve

कऱ्हाड (सातारा): चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या कोकण भागातील रस्त्यांवर अद्यापही हवी तेवढी सुरक्षा यंत्रणा उभी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणच्या वाटांवर ठारविक वेळी होणारे पट्रोलींग वगळल्यास अन्यवेळी त्या पाऊल वाटांवर कोणीही बिनधास्त व्याघ्र प्रकल्पात शिरू शकतो, अशी स्थीती आहे.

काही महिन्यापूर्वी व्याघ्र प्रकलापात लावलेले कॅमेरे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कॅमेऱ्याच्या जीवावर व्याघ्र प्रकल्पावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या वन्यजीव विभागही त्यामुळे खडबडून जागा झाला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप तेथे हवी तेवढी सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील श्वापदांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक कामे सुरू आहेत. विविध भागात कामे सुरू आहेत. सुरक्षेच्या बाबतीत मात्र मोठे दुर्लक्ष दिसत आहे. येथे स्पेशल फोर्सची गरज असतानाही अद्याप शासनाने ती दिलेली नाही. त्याशिवाय वाघांच्या संरक्षणासाठी अद्यायावत अशी यंत्रणा य़ेथे आलेली नाही.

राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत येथे अत्याधुनिक यंत्रणा देताना होणारे दुर्लक्ष श्वापदांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. वाघांची व बिबट्यांची संख्या वाढत असल्याने येथे त्यांचे खाद्य जंगलात उपलब्ध व्हावे, यासाठी येथे हरण, भेकरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प वगळता प्रकल्पातील अन्य मोठ्या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. त्यात कोकणातून येणाऱ्या पाऊल वाटांवर सुरक्षा कुटी उभा करण्याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पात येणाऱ्या या पाऊल वाटा चोर वाट्यासारख्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांवर नजर ठेवणे तसे कठीण आहे.

किमान डझनभर लोकांना सहा महिन्यान पकडण्यात आले. त्याच वाटावंवरील वाघ, बिबट्यांच्या निरिक्षणासाठी लावलेले कॅमेरेही लोकांनी चोरून नेले आहेत. त्यावर पर्याय म्हणून कोकणातून येणाऱ्य़ा काही वाटांच्या उगमस्थानाच्या गावात वन्यजीव विभागाने सुरक्षा कुटी उभारल्या आहेत. तेथे कर्मचारी राहतात. मात्र त्या तितक्याशा पुरेशा नाहीत. वन्यजीव विभागाने मध्यंतरी कोकणातून व्याघ्र प्रकल्पात जाणाऱ्या वाटावर प्रकल्पात सुरक्षा कुटी उभा करण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासाठी शासनानला वेळ नाही, अशी स्थिती आहे. कोकणाच्या गावातून रस्त्या प्रकल्पात जेथे संपतो, तेथे सुरक्षा कुटी असावी, असा प्रयत्न होण्याची गरज आहे.

वन्य जीव विभागाने त्यासाटी काही ठिकाणांचा सर्व्हेही केला होता. त्यात पाली, झुंगटी, मालदेव, शिरशिंगी, ताकवली, रूंदीव, नवजा, सिद्धेश्वर, घाटामाथा, भैरवगड अशा काही गावांचा उल्लेख होता. या गावातून वर येणार्या वाटा चोरट्या स्वरूपाच्या आहेत. त्या खाली कोकमात जावून मिळतात. त्यामुळे कोकणातून येणारी वाट वर प्रकल्पात संपली की तेथे सुरक्षा कुटी असावी, असा वन्यजीव विभागाव वपर्यावरण अभ्यासकांचे म्हणमे आहे. त्या अनुशंगाने मद्यंतरी प्रश्तावही देण्यात आला आहे. एका सुरक्षा कुटीला किमान पाच लाख व त्याही पेक्षा जास्त खर्च अपेक्षीत आहे. तो खर्च मिळण्यासाठी शासनानकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे फारसे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याने ती मागणी धुळखात पडली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com