‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ एनआयईच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ एनआयई नाट्यस्पर्धा २०१८’ स्पर्धेस शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या स्पर्धेत शहर व परिसरातील १७ शाळा सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धा १४ व १५ फेब्रुवारीस शाहू कलामंदिरात होणार आहेत. 

श्री कैलास फूड इंडस्ट्रीज (अमृतवाडी) हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, तर जंगलहुड, पेस आयआयटी ॲण्ड मेडिकल सातारा, कणसे होंडा - ह्युंदाई हे सहप्रायोजक आहेत. शाहू कलामंदिरात होणाऱ्या स्पर्धेअंतर्गत १४ फेब्रुवारीस सकाळी दहापासून शाळांचे संघ एकांकिका सादर करणार आहेत. 

१४ रोजी एकांकिका सादर करणाऱ्या शाळा
नवीन मराठी शाळा, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाढवली, अनंत इंग्लिश स्कूल सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ, त. ल. जोशी विद्यालय वाई, कन्या शाळा सातारा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा.

१५ रोजी एकांकिका सादर करणाऱ्या शाळा
साधना इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, साखरवाडी माध्यमिक विद्यालय साखरवाडी (ता. फलटण), दिशा ॲकॅडमी वाई, अजिंक्‍यतारा प्राथमिक विद्यालय शेंद्रे (सातारा), निर्मला कॉन्व्हेंट सातारा, लोकमंगल हायस्कूल कोडोली (सातारा).

विजेत्या संघांना रोख बक्षिसे
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघाना रोख रक्‍कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक कलाकारास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तसेच दिग्दर्शन, संगीत योजना, प्रकाश योजना, नेपथ्य यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींना रोख बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे. अधिक माहितीसाठी विजय सुतार (मोबाईल ८३८००९२२११), चित्रा भिसे (मोबाईल ९९२२९१३३५८) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: satara news sakal nie drama competition