क्रिकेटपटूंसाठी ‘एसएससीएल’ ठरेल मोलाची  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सातारा - मन, शरीर, युक्ती आणि तंत्र हे क्रीडाक्षेत्रातील यशाचे चार आधारस्तंभ आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनात खिलाडीवृत्ती वाढते. ‘एसएससीएल’ स्पर्धा ही क्रिकेटपटू घडविण्यात मोलाची ठरत असल्याचे मत सागर भोसले यांनी व्यक्त केले. 

सातारा - मन, शरीर, युक्ती आणि तंत्र हे क्रीडाक्षेत्रातील यशाचे चार आधारस्तंभ आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनात खिलाडीवृत्ती वाढते. ‘एसएससीएल’ स्पर्धा ही क्रिकेटपटू घडविण्यात मोलाची ठरत असल्याचे मत सागर भोसले यांनी व्यक्त केले. 

सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल) स्पर्धा सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात रंगणार आहे. पेस आयआयटी-मेडिकल (सातारा) यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. स्पर्धेतील महाराजा सयाजीराव हायस्कूल संघाचे दातृत्व बोरगाव (ता. सातारा) येथील हॉटेल महाराजा पॅलेसचे संचालक सागर भोसले यांनी स्वीकारले. त्यावेळी हेमलता भोसले, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, ब्रॅंच मॅनेजर राजेश निंबाळकर, सागर भोसले, मुख्याध्यापक डी. जी. जाधव, उपमुख्याध्यापक व्ही. एच. कदम, क्रीडा शिक्षक संजय अहिरेकर, सिनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह विजय जगताप उपस्थित होते. 

दरम्यान, येत्या १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील सहभागी शाळांचे संघ विविध मैदानांवर सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत सराव करू लागले आहेत. संबंधित शाळांच्या संघांचे प्रशिक्षक खेळाडूंकडून फिटनेस, फलंदाजी, गोलंदाजीचा सराव करून घेत आहेत. संघबांधणी करताना छोट्या छोट्या गोष्टींचे धडे खेळाडूंना मिळू लागले आहेत. 

खेळामुळे तन अन्‌ मनाची समृद्धी होते. शुद्ध विचाराचे विद्यार्थीच चांगला समाज घडवू शकतात. आमचे आणि रयत शिक्षण संस्थेचे ऋणानुबंध घट्ट आहेत. आई, वडील ‘रयत’मध्ये कार्यरत होते तर मी महाराजा सयाजीराव हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे. आमच्या शाळेने शैक्षणिक बरोबरच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करावी, अशी भावना असल्यानेच प्रोत्साहन देत आहोत.
- सागर भोसले, संचालक, हॉटेल महाराजा पॅलेस, बोरगाव

Web Title: satara news Sakal School Cricket League