शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत साताऱ्यातील 50 विद्यार्थी

विशाल पाटील
गुरुवार, 29 जून 2017

पूर्व माध्यमिकची वडूज येथील कश्‍नूर शेख 93.95 टक्‍के गुणांसह ग्रामीण विभागात राज्यात प्रथम 

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत सातारा जिल्ह्यातील एकूण 50 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. दरम्यान वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील कश्‍नूर शेख हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात 93.95 टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या हायस्कूलच्या एकूण 69 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत जिल्ह्यात झेंडा फडकविला आहे.

पूर्व प्राथमिकमध्ये 30.58 टक्‍के, तर पूर्व माध्यमिकमध्ये 14.57 टक्‍के विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (ता. 27) www.mscepune.in व www.puppss.in या संकेतस्थळावर जाहीर झाला. 
पूर्व उच्च प्राथमिकमध्ये (इयत्ता पाचवी) जिल्ह्यातील एक हजार 771 शाळांमधील 19 हजार 919 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी सहा हजार 146 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 474 (30.58 टक्‍के) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यामध्ये मुले 256 (29.92 टक्‍के), तर मुली 218 (31.16 टक्‍के) शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी विभागात जिल्ह्यातील 17, तसेच ग्रामीण विभागात 08 विद्यार्थी चमकले आहेत. 

पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील 826 शाळांमधील 17 हजार 058 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 हजार 522 उत्तीर्ण झाले, तर 457 (14.57 टक्‍के) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. यामध्ये 206 मुले (14.22 टक्‍के), तर 251 मुली (14.86 टक्‍के) शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. या परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत शहरी विभागात सहा, तर ग्रामीण विभागात 19 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. 

गुणपत्रकाची शाळेच्या लॉगीनवर डिजिटल प्रत 
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रक, प्रमाणपत्र वितरित केले जाणार नसून त्याऐवजी डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये टाकण्यात येणार आहे. शाळेने त्याची चांगल्या प्रतीच्या कागदावर रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी अथवा डिजिटल प्रतीची सॉप्ट कॉपी मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी, तसेच शाळांनी गुणपत्रक, प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती कायमस्वरूपी जतन करून ठेवाव्यात, अशी सूचना राज्य परिषदेने शाळांना केली आहे. 

शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या : 
पूर्व उच्च प्राथमिक : महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा (42), अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (25), छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज (22), न्यू इंग्लिश स्कूल, सातारा (18), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई (11). 

पूर्व माध्यमिक : छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज (47), अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (28), यशवंत हायस्कूल, कऱ्हाड (17), आदर्श विद्यालय, रहिमतपूर (16), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन, म्हसवड (15), महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा (14), न्यू इंग्लिश स्कूल, सातारा (13), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माजेरी (12), प. म. शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी (12), सरस्वती विद्यामंदिर, कऱ्हाड (11), 
ज्ञानसंर्वधिनी प्राथमिक शाळा, शिरवळ (10). 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी, शहरी विभाग) 
प्रभू केसकर (94.00, राज्यात पाचवा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड) 
स्वरा टकले (93.33, राज्यात सहावी, परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी) 
राही पाखले (93.33, राज्यात सहावी, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा) 
प्रणव शिंदे (93.33, राज्यात सहावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड) 
वैष्णवी जाधव (93.33, राज्यात सहावी, परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय) 
प्रणव शेवाळे (92.66, राज्यात आठवा, सरस्वती विद्यामंदिर, कऱ्हाड) 
पायल पवार (92.66, राज्यात आठवी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा) 
निकिता कोराटे (92.66, राज्यात आठवी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा) 
श्रेयश पाटील (92.66, राज्यात आठवा, वसंतदादा पाटील विद्यालय, रहिमतपूर) 
अथर्व माने (91.33, राज्यात 11 वा, आदर्श विद्यालय, रहिमतपूर) 
सिद्धांत फडतरे (91.33, राज्यात 11 वा, महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा) 
प्रेरणा विभूते (90.66, राज्यात 13 वी, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा) 
श्रेया गरुड (90.66, राज्यात 13 वी, आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर) 
प्रसाद जाधव (90.00, राज्यात 15 वा, महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा) 
वरद कुंभार (90.00, राज्यात 15 वा, सरस्वती विद्यामंदिर, कऱ्हाड) 
वेद डफळे (90.00, राज्यात 15 वा, वसंतदादा पाटील विद्यालय, रहिमतपूर) 
सिद्धी मुळीक (90.00, राज्यात 15 वी, महाराजा सयाजीराव हायस्कूल, सातारा) 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी, ग्रामीण विभाग) 
अमोघ प्रसाद वाळेकर (95.33 टक्के, राज्यात द्वितीय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज) 
सायली महांगडे (95.33, राज्यात द्वितीय, भैरवनाथ विद्यालय पसरणी), 
विशाखा आरेकर (94.66, राज्यात तृतीय, सुलोचना पाटणकर विद्यालय पाटण) 
संकेत सजगणे (94.66, राज्यात तृतीय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
वैष्णवी महांगडे (92.66, राज्यात सहावी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पसरणी) 
मयंक चांदोले (92.66, राज्यात सहावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माजरी, फलटण) 
यश जाधव (92.00 छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, गिरवी), 
वेदांग शिर्के (92.00, राज्यात सातवा, सरस्वती विद्यालय, कोरेगाव) 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी, शहरी विभाग) 
आकांशा कदम (91.15 टक्के, राज्यात 11 वी (सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, कोरेगाव) 
श्रेया वीरकर (90.60, राज्यात 12 वी, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा), प्रणव सराटे (89.93, राज्यात 14 वा, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा), साहिल भोसले (89.26, राज्यात 16 वा, द्रविड हायस्कूल, वाई), ओंकार गंबरे (88.59, राज्यात 18 वा, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा), मानसी कोरडे (87.91, राज्यात 20 वी, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा). 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी, ग्रामीण विभाग) 
कशनूर युनूस शेख (93.95 टक्के, राज्यात प्रथम, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज), 
ऐश्वर्या खाडे (90.60, राज्यात चतुर्थ, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज), 
ओंकार माळवे (89.26, राज्यात आठवा, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज), 
वेदांती जाधव (89.26, राज्यात आठवी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
वेदांतिका वाघ (87.75, राज्यात तेरावी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, पसरणी) 
वरद मगर (87.07, राज्यात 15 वा, इंग्लिश मीडियम स्कूल) 
स्नेहल हांगे (86.57, राज्यात 16 वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
शिवानी जाधव (95.23, राज्यात 19 वी, रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, अतीत) 
सुमेधा माने (84.56, राज्यात 20 वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
वैष्णवी कदम (84.56, राज्यात 20 वी, ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, पाटण) 
आनंदी खाडे (84.56, राज्यात 20 वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
सार्थक सुकटे (83.89, राज्यात 22 वा, श्री.श्री. विद्यालय, औंध) 
अंजली माळी (83.89, राज्यात 22 वी, न्यू इंग्लिश स्कूल, अंगापूर) 
रोहित राऊत (83.22, राज्यात 24 वा, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
रिया खुस्पे (83.22, राज्यात 24 वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 
शाल्वी शहा (82.99, राज्यात 25 वी, होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल) 
स्वरांजली गोरे (82.55, राज्यात 26 वी, श्री हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव) 
संध्या वाघमारे (82.55, राज्यात 26 वी, छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) 

Web Title: satara news satara students shine in scholarship