शाळांसाठी ठेवणार आपत्कालीन निधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सातारा - शाळांच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावर अत्यल्प निधी येत असल्याने, तसेच जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर होण्यास उशीर होत असल्याने तोपर्यंत शाळांची दुरुवस्था कायम राहते. ते टाळण्यासाठी आपत्कालीन स्थिती शाळांची होणार नुकसानाची दुरुस्तीसाठी पुरवणी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण सभापती राजेश पवार यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानातून यापूर्वी भरीव तरतूद केली जात होते. मात्र, अनेक वर्षांपासून या निधी घटविण्यात आला आहे. त्यामुळे शाळांची दुरुस्ती रखडत आहेत. जिल्हा नियोजन समितीतून शाळा दुरुस्ती, इमारतींसाठी निधी मिळत असला, तरी त्याची प्रक्रिया अनेक महिने चालणारी असल्याने निधी मिळण्यास उशीर होत असतो. 

सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विषय असल्याने पश्‍चिमेकडे जादा पाऊस, तर पूर्वेकडे दुष्काळी परिस्थिती असते. अनेकदा अवकाळी पाऊस, जोरदार, वादळी वाऱ्यांमुळे शाळा इमारतींची पडझड होत असते. वादळांमुळे पत्रे उडून गेल्यास, भूकंपात भिंती पडल्यास संबंधित शाळांना दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते, तसेच नादुरुस्त इमारतींमुळे दुर्घटना होण्याची शक्‍यताही असते. त्यावर पर्याय म्हणून अशा शाळांना तत्काळ मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुरवणी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्याचा शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे अशी आपत्कालीन परिस्थिती उभी राहिल्यास संबंधित निधीतून दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले. 

Web Title: satara news school fund