शाळा किलबिलणार... पहिली घंटा आज होणार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सातारा - पहिलीत प्रवेश करणारी मुले चक्‍क बैलगाडी... मिरवणुकीद्वारे शाळेत येतील. लेझीम, झांजपथक, ढोल पथकांच्या वाद्यात त्यांच्या स्वागताचा गजर होईल... हाती गुलाबाचे पुष्प, मिठाई येईल... असा हा शाळेचा पहिला दिवस उत्सवी थाटाचा होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी शाळा-शाळांमध्ये करण्यात आली असून, उद्या (ता. १५) बालचिमुकल्यांच्या किलबिलाटात शाळांचे परिसर फुलून जाणार आहेत. 

बालकांचा मोफत आणि सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालक शिकले पाहिजे. बालकांना शाळेत प्रवेशित करून त्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत, खायला गोडधोड पदार्थ, पाठ्यपुस्तके असा सगळा बाज तयार करीत, प्रवेशोत्सव साजरा करण्याची पद्धत काही वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीही तशी तयारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली आहे. 

उद्या (गुरुवारी) आनंददायी वातावरणात, वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची गोडी वाढावी, यासाठी पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश यांचेही वाटप होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत शाळेचा परिसर, वर्गखोल्या स्वच्छ केल्या आहेत. शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा काढली जाणार आहे.

प्रवेशोत्सवासाठी ‘सकाळ’ तुमच्या सोबतीला...
जिल्हाभरातील प्राथमिक शाळांमध्ये गुरुवारी प्रवेशोत्सव होईल. तुमच्या शाळांमध्ये किलबिलाटात होणारा हा उत्सव तुम्ही धडाक्‍यात, उत्साहात साजरा करालच. तो प्रवेशोत्सव तुम्ही सर्वांना ‘शेअर’ करावा यासाठीच ‘सकाळ’ आहे तुमच्या सोबतीला. तुमचा हा प्रवेशोत्सव आम्ही सर्वांसोबत ‘शेअर’ करू... त्यासाठी शाळेचे नाव, प्रवेशोत्सवाचे वर्णन, छायाचित्र ‘सकाळ’च्या ७७२१९ ८४४४१ व्हॉट्‌सअॅप क्रमांकावर पाठवा.

Web Title: satara news school start today