प्राथमिक शाळांत होणार स्वच्छ भारत पंधरवडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सातारा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने एक ते १५ सप्टेंबरदरम्यान शाळाशाळांत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. ‘स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे,’ या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये शपथ घेण्यापासून ते विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

सातारा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने एक ते १५ सप्टेंबरदरम्यान शाळाशाळांत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. ‘स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे,’ या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये शपथ घेण्यापासून ते विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय हे  मिशन राबविले. या राष्ट्रीय अभियानाचा प्रतिसाद म्हणून राज्याने स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र हे अभियान सुरू केले. आता एक सप्टेंबरपासून स्वच्छ भारत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये शाळा व शिक्षण संस्थांना एक रोजी स्वच्छता शपथ घेणे. पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांच्या बैठका घेऊन स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, शाळा, घरांमध्ये स्वच्छतेच्या सवयींसाठी प्रोत्साहित करणे, स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करणे, जिल्हा, तालुका स्तरावर स्पर्धांचे आयोजन करणे, चित्रकला, वादविवाद, जागरूकतेविषयी स्पर्धा घेणे आदी उपक्रम घेतले जातील, तसेच जुन्या अभिलेखांची अनावश्‍यक कागदपत्रे काढून टाकणे, नियमानुसार अभिलेख दप्तरी दाखल करणे, शाळा परिसरातून टाकाऊ साहित्य पूर्णत: काढून टाकणे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींसह जवळील नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छतेचा प्रचार करणे, ओला, सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे आदी बाबी सुचविल्या आहेत. 

मुलांना दररोज सात प्रकारे हात स्वच्छ धुण्याची सवय लावणे, शौचालयात शौचास जाण्याची सवय लावणे, कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यास शिकविणे, स्वच्छ कपडे घालण्यास प्रवृत्त करणे, वर्ग, घर, परिसर स्वच्छ, सुंदर करतील, असे शिक्षण विद्यार्थ्यांना या कालावधीत दिले जावे. याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी काढले आहे.

विद्यार्थी राजदूत
शाळांत दररोज स्वच्छतेची शपथ घ्यावी. या अभियानात समाजाचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. ‘स्वच्छ भारत’ यावरील गीतांचे प्रसारण करावे, तसेच या कालावधीत स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘विद्यार्थी राजदूत’ (विद्यार्थी ब्रॅंड ॲम्बेसिडर) यांच्या नियुक्‍या कराव्यात, असेही नमूद केले आहे. 

Web Title: satara news school swachh bharat abhiyan