सुरक्षा पथके देणार वन विभागाला साथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सातारा - मानव व बिबट्यातील संघर्ष टाळण्यासाठी शाहूपुरीपाठोपाठ शाहूनगरमध्ये ‘सकाळ’च्या पुढाकाराने व वन विभागाच्या मान्यतेने वन्यजीव आपत्कालीन सुरक्षा पथक स्थापन झाले. या दोन्ही पथकांची एकदिवशीय कार्यशाळा उत्साहात झाली. अशी पथके वन्यजीवांच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत वन विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.

बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर ही सातारकरांसाठी नित्याची बाब बनली आहे. लोकांचे कुतूहल कायम असल्याने शाहूपुरीत गेल्या महिन्यात मानव-बिबट्या असा संघर्ष उभा राहिला. बघ्यांच्या गर्दीतील तिघे बिबट्याच्या हल्ल्यात जायबंदी झाले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ’सकाळ’च्या पुढाकाराने व वन विभागाच्या सहकाऱ्याने साताऱ्यात शाहूपुरी व शाहूनगर या ठिकाणी वन्यजीव आपत्कालीन सुरक्षा पथके स्थापन झाली आहेत. ही पथके स्वयंसेवी पद्धतीने काम करतील. या पथकांतील सदस्यांची कार्यशाळा ‘वन भवन’ येथे झाली. मानद वन्य जीवरक्षक सुनील भोईटे व उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी बिबट्याच्या सवयी, त्याची मानसिकता, बिबट्यांचे नागरीकरण आदींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, वन क्षेत्रपाल महेश पाटील उपस्थित होते. 

माध्यम म्हणून ‘सकाळ’ अग्रणी आहे. बिबट्यांच्या नागरीकरणाच्या विषयामध्ये ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची पथके स्थापन होत आहेत. ही पथके मानव-वन्यजीवन संघर्ष टाळण्याकामी मोठी जबाबदारी पार पाडतील,’ असा विश्‍वास अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला. श्रीकांत कात्रे यांनी ‘सकाळ’ची भूमिका विषद केली.

Web Title: satara news security scoud forest department help