निवडक पंचायतींची एकपासून तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

सातारा - केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) हा कार्यक्रम सुरू होत असून, त्यात एक ते ३१ ऑगस्टदरम्यान केंद्र शासन नियुक्‍त त्रयस्थ संस्थेमार्फत यादृच्छीक पद्धतीने (रॅन्डम) निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील दहा ते १६ ग्रामपंचायती तपासल्या जातील. 

सातारा - केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) हा कार्यक्रम सुरू होत असून, त्यात एक ते ३१ ऑगस्टदरम्यान केंद्र शासन नियुक्‍त त्रयस्थ संस्थेमार्फत यादृच्छीक पद्धतीने (रॅन्डम) निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील दहा ते १६ ग्रामपंचायती तपासल्या जातील. 

गावातील स्वच्छता व स्च्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता पाहण्यासाठी ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, बाजार पेठांची ठिकाणे या ठिकाणच्या स्वच्छता सुविधा, त्याचा वापर, स्वच्छतेविषयी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची स्वच्छतेविषयी असणारी समज, त्यांची मते विचारात घेतली जाणार आहेत. ग्रामपंचातीच्या आधारावर जिल्ह्यांची आणि राष्ट्रीय स्तरावर राज्यांची तुलना करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळणाऱ्या जिल्ह्याना राष्ट्रीय स्तरावरून दोन ऑक्‍टोबरला पुरस्कार देऊन गौरविण्यात  येणार आहे.

राष्ट्रीयस्तरावर स्वच्छतेचा दर्जा उंचवावा व स्वच्छता ही जनतेची जीवनशैली व्हावी हा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत सूचना दिल्या आहेत.  लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन त्याची माहिती ग्रामस्थांना द्यावी. त्याबाबत तातडीचा कृती कार्यक्रम आखून आपली ग्रामपंचायत सर्व निकषांसाठी पात्र राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी केले आहे.

असे आहे गुणांकन...
शौचालयांच्या उपलब्धतेस पाच गुण, त्याच्या वापरास पाच गुण, कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनास प्रत्येकी दहा- दहा, नागरिकांमधील जागृती, त्यांचे अभिप्रायास ३५ गुण, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारीमुक्‍तीची ग्रामपंचायतींची टक्‍केवारी, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, फोटो अपलोडिंग कार्यक्रम आदीस ३५ असे १०० गुण दिले जातील. 

Web Title: satara news Selected Panchayat checking