सेल्फी वुईथ खड्डे विरुद्ध खड्डेमुक्‍त महाराष्ट्र!

सेल्फी वुईथ खड्डे विरुद्ध खड्डेमुक्‍त महाराष्ट्र!

सातारा - राज्यभरातील रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले असतानाही खड्डे बुजविण्याचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सेल्फी वुईथ खुड्डे’ ही ट्विटरवर मोहीम उघडली. त्याला उत्तर देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ‘खड्डेमुक्‍त महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली. या ट्विटर युद्धात सर्वसामान्यही सहभागी होत असून, खड्डे पडलेल्या रस्त्यांची छायाचित्रे चंद्रकांत पाटील व सुप्रिया सुळेंना टॅग करत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांनी राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी एक नोव्हेंबरला ‘सेल्फी विथ खड्डे’ ही हॅश टॅग मोहीम उघडली. स्वत: तसे फोटो काढून ते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटरवर टॅगही केले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आपल्या भागातील खड्ड्यांचे सेल्फी काढून ते सुप्रिया सुळे, मंत्री पाटील यांच्या ट्विटरवर टॅग केले. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘सेल्फी काढून खड्ड्यांचा प्रश्‍न सुटणार नाही,’ असे विधान केल्याने सुळेंच्या आंदोलनातील हवा काहीशी कमी झाली होती, तरीही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था ट्विटर, फेसबुकवर मांडली. 

सोशल मीडियाचा वापर करताना मंत्री पाटील यांनीही सुळेंच्या मोहिमेला ट्विटरवर उत्तर देण्यासाठी ‘खड्डेमुक्‍त महाराष्ट्र’ ही हॅश टॅग लाइन वापरून उत्तर दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, त्याची छायाचित्रे काढून ती ट्विटरवर अपलोड केली जात आहेत.  

या ट्विटर युद्धात आता सामान्यांनी उडी घेतली आहे. आपले गाव, तालुका, जिल्हा मार्गावरील खड्ड्यांचे फोटो काढून ते आता सुळे व पाटील यांना टॅग लाइनवर ‘ट्विट’ केली जात आहेत. शिवाय, अनेक वर्षे रस्ते खड्डेयुक्‍त असल्याने त्यावर टीकाही केली जाताना दिसते.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे ट्विट...
खड्डे बुजविण्यास एक हजार २०० कोटींवरून चार हजार कोटींचे बजेट
प्रत्येक जिल्ह्यासाठी खड्डे बुजविण्यास १५ कोटींचा निधी
१५ डिसेंबरपर्यंत ‘पीडब्ल्यूडी’चे रस्ते खड्डेमुक्‍त करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com