सातारा... फिलिंग इन स्वित्झर्लंड

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सातारा : साताऱ्याच्या निसर्गसंपन्नता व सृष्टी सौंदर्याबद्दल मी खूप ऐकले होते. कास पठार व डोंगरदऱ्या पाहिल्यानंतर आपल्याकडे ही साक्षात स्वित्झर्लंड असल्याची भावना सह्याद्रीच्या कुशीत प्रसिद्ध कोरिओग्राफर शक्ती मोहन हिने स्वतःचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त केली आहे.

शक्ती मोहन नुकतीच साताऱ्यात आली होती. तिने कास पठार आणि अन्य निसर्गरम्य ठिकाणी भेट दिली. आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटोसेशनही केले. त्यातील काही फोटोज तिने इन्स्टाग्राम, फेसबुकवर अपलोड केले. प्रसन्न भावमुद्रेत टिपलेल्या एका छायाचित्रासोबत शक्ती मोहनने साताऱ्याची तुलना स्वित्झर्लंडबरोबर केली आहे. हे ठिकाण उशिरा समजल्याचा खेद व्यक्त करून देशप्रेमाची भावना व्यक्त केली आहे. शेवटी तिने 'जय भारत, जय महाराष्ट्र, जय सातारा' असेही लिहिले आहे. तिची ही पोस्ट प्रत्येक सातारकर अभिमानाने शेअर करू लागला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news shakti mohan say Satara filling in Switzerland