शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे 'ते' वक्तव्य वैयक्तिक

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सातारा ः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलकांना पाठिंबा देताना जे वक्तव्य केले, ते वक्तव्य वैयक्तीक होते, त्याचा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाशी संबंध नाही, असा खूलासा संघाचे सरचिटणीस सिद्धार्थ खरात यांनी आज (शुक्रवार) केला.

सातारा ः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलकांना पाठिंबा देताना जे वक्तव्य केले, ते वक्तव्य वैयक्तीक होते, त्याचा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाशी संबंध नाही, असा खूलासा संघाचे सरचिटणीस सिद्धार्थ खरात यांनी आज (शुक्रवार) केला.

श्री. भोसले हे गुरुवारी (ता. 28) आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी आले होते. त्यावेळी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपूढे मांडल्या त्या त्यांच्या वैयक्तिक आहेत. त्यांनी त्या पाठींबा करीता घोषीत केल्या होत्या. परंतु, त्याच्याशी आंदोलनकर्ते आणि युनियन म्हणून आमचा तीळमात्र संबंध नाही. त्या त्यांनी राजकारण आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत. त्याचा उहापोह करण्याचा येथे प्रयत्न केला, असा खूलासा श्री. खरात यांनी केला.

दरम्यान, पालिका पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने गुरुवारपासून (ता. 28) घंटागाडी बेमुदत आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती खरात यांनी दिली. गुरुवारी घंटागाडी बंद आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी आमदार भोसले यांनी घंटागाडीवाले म्हणत होते, 50 लाखांची तोड झाली आहे. मला काही माहिती नाही असे माध्यमांपूढे त्यांनी नमूद केले होते. आज (शुक्रवार)आंदोलनकर्त्यांनी पालिकेत सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर घंटागाडी बेमुदत बंद आंदोलन स्थगित केले.

Web Title: satara news shivendra singh raje bhosale Statement personal