शॉर्ट सर्किटने आग लागून दुकान भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

तारळे (ता. पाटण, जि. सातारा): येथील एक दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले, शेजारी असणाऱ्या दुसऱ्या दुकानाला याची झळ पोहोचली. सकाळी अकराच्या सुमारास घटना घडली. या आगीत दुकानातील महागडे कॅमेरे, फोटो स्टूडीओचे साहीत्य, झेरॉक्स मशिन कॉम्पूटर, बँक सेवा केंद्राची कागदपत्रे, फर्निचर व इतर साहित्यासह संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले, तर शेजारच्या दुकानालाही थोडी झळ बसली आहे. आग ही शॉक सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत सुमारे साडे तेरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तारळे घोट रस्त्यावर विजय बापुराव सपकाळ (रा. डफळवाडी ता. पाटण) यांचे केदारनाथ फोटो स्टुडीओ नावाचे दूकान होते या शिवाय बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र, झेरॉक्स, लॅमिनेशन आदींचा ते व्यवसाय करत होते. आज (गुरुवार) सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी नऊला दुकान उघडले. सुमारे पावणे अकराच्या दरम्यान दुकान बंद करून कामानिमित्त ते बँकेत गेले.

अकराच्या दरम्यान एका व्यक्तीला दुकानातून वरच्या बाजुने धूर येत असल्याचे दिसले. तेथील काहींनी सपकाळ व वीज वितरण ऑफीसला माहिती दिली. तोपर्यंत काही युवकांनी शटर उघडले. त्यावेळी दुकानाने पेट घेतला होता. दरम्यान, विजपूरवठा खंडित करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक युवक जमा होऊन आजूबाजूला असलेल्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र, अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहीत्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बाजूला पाण्याची बोअर असूनही आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

सपकाळ यांच्या दुकानातील बँकेची कागदपञे, झेरॉक्स मशिन, महागडे तीन कॅमेरे, स्टुडीओचे स्टँड, आल्बम, काम्पूटर, लॅपटॉप, फर्निचर व इतर उपयोगी साहीत्य जळून खाक झाले, तसेच त्या दुकानाशेजारी देवानंद लोहार यांच्या आसलेल्या जोतिर्लिंग रेडियम आर्ट व डिजीटल या दुकानालाही या आगीची झळ बसून सुमारे साडेतीन लाखांचे असे एकत्रित अंदाजे साडे तेरा लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉक सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच विजवितरण कंपनीच्या अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तलाठी धनंजय भोसले यांनी पंचनामा केला.

Web Title: satara news short circuit fire