काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सातारचा जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

साताराः  काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय 38) हे हुतात्मा झाले आहेत. सैन्य दलाने आज (शनिवार) संध्याकाळी मेढा पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली.

मोहाट येथील धनावडे कुटुंबीयांना जवान रवींद्र हे हुतात्मा झाल्याचे सांगण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत. दरम्यान, जवान रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: satara news solder ravindra dhanawade martyr in jammu-kashmir