घनकचरा व्यवस्थापनाचा ‘स्टार्टअप’

विशाल पाटील
शनिवार, 20 जानेवारी 2018

सातारा - घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींत राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे प्रकल्प २६ गावांत कार्यान्वित झाले आहेत. ८७ गावांतील कामे प्रगतिपथावर असून १०६ ग्रामपंचायती अद्यापही मागच्या पायरीवर आहेत. त्यांना अधिक गती देण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर असणार आहे. 

सातारा - घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींत राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे प्रकल्प २६ गावांत कार्यान्वित झाले आहेत. ८७ गावांतील कामे प्रगतिपथावर असून १०६ ग्रामपंचायती अद्यापही मागच्या पायरीवर आहेत. त्यांना अधिक गती देण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर असणार आहे. 

स्वच्छ भारत अभियानातील (ग्रामीण) दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमात आघाडी घेण्यासाठी जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता विभागाची यंत्रणा कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गावागावांत घनकचरा, सांडपाण्याची समस्या तीव्र होत आहे. ती हाताबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन राबविणे अत्यंत आवश्‍यक आहे.

त्यादृष्टीने लोकसंख्येने मोठी असलेले गावे, बाजारतळाची गावे, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या २१९ गावांची निवड करून तेथे घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती राजेश पवार, मनोज पवार, वनिता गोरे, शिवाजी सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी आराखडा तयार केला आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील बनवडी येथे हा प्रकल्प पथदर्शी स्वरूपात राबविला असून, त्या धर्तीवर आता जिल्हाभरात राबविला जात आहे. घनकचरा प्रकल्पासाठी जागेची निवड करणे, कुटुंबात ओला, सुका कचरा वेगळा करणे, संकलनासाठी बचतगट, कर्मचारी नेमणे, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत करणे, विक्रीयोग्य कचऱ्याची विक्री करणे, गावपातळीवर समिती गठित करणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे आदी कामे सध्या २६ गावांमध्ये पूर्ण झाली आहेत, तर ८७ गावांत सध्या सुरू आहेत. 

कऱ्हाड पुढे, फलटण मागे
या प्रकल्पासाठी सर्वाधिक ग्रामपंचायती कऱ्हाड तालुक्‍यातील ५५ असून, त्यातील सात गावांत पूर्ण, ३६ गावांत कामकाज सुरू आहे. मात्र, १२ गावांत अद्याप काम सुरू नाही. मात्र, अध्यक्षांच्या फलटण तालुक्‍यातील सात गावांत पूर्ण, तर सात गावांत काम सुरू आहे; परंतु १८ गावांत प्रकल्प सुरूच झाला नाही. कोरेगावमधील १५ पैकी १३ गावांत, माणमधील १८ पैकी १६, खंडाळ्यातील आठ पैकी पाच, जावळीतील सात पैकी पाच, पाटणमधील नऊ पैकी सात प्रकल्पांचा प्रारंभही झाला नाही.

Web Title: satara news solid garbage management startup