क्रिकेटपटू घडविण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक सरसावले! 

क्रिकेटपटू घडविण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक सरसावले! 

सातारा - शाळकरी मुलांतून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांच्यासारखे खेळाडू तयार होऊन त्यांच्याकडून "विराट' पराक्रम व्हावा, यासाठी साताऱ्यातील शैक्षणिक संस्थांसह बांधकाम व्यावसायिक, उद्योजक सरसावले आहेत. सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेसाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि गुरुकुल स्कूल या संघांच्या दातृत्वांशी नुकताच करार झाला. पेस आयआयटी-मेडिकल (सातारा) यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 

ही स्पर्धा सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांचा संघ करारबद्ध करण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, तसेच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, विविध शाळांचे माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाचे दातृत्व वाईतील फरांदे डेव्हलपर्सचे संचालक सचिन फरांदे यांनी, तर  गुरुकुल स्कूल संघाचे दातृत्व गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी स्वीकारले. त्या वेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य एस. एन. साहू, जनसंपर्क अधिकारी मनोज जाधव, राजेंद्र चोरगे, गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी विश्‍वनाथ फरांदे,  "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम, सिनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह प्रदीप राऊत उपस्थित होते. 

स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपल्या भागातील मुले चमकावीत यासाठी "एसएससीएल' स्पर्धेचा उपक्रम अनोखा आहे. अभ्यासाबरोबरच मुलांनी खेळातही प्रगती केली पाहिजे, अशी भूमिका फरांदे डेव्हलपर्सची कायम राहिली आहे. फलंदाज, गोलंदाजांचे कौशल्य केवळ संघांतील खेळाडूच नव्हे, तर त्यांचे पाठीराखेदेखील पाहात असतात. याच पाठीराख्यांतून आणखी उत्तम खेळाडू मैदानात उतरतील, या विश्‍वासाने खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार आहे. 
- सचिन फरांदे, फरांदे डेव्हलपर्स, वाई 

विद्यार्थ्यांच्या कौशल्यास वाव देण्यासाठी "गुरुकुल' नेहमी प्रयत्नशील असते. होतकरू खेळाडूंना गेल्या दोन वर्षांत "एसएससीएल'च्या माध्यमातून उत्तम प्लॅटफार्म मिळाला आहे. त्यांच्यामधील गुणवत्तेला वाव मिळाल्यानेच जिल्ह्यात उत्तम खेळाडू निर्माण होण्यास मदत होत आहे. 
- राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com