चालकाला चक्कर आल्याने बस उलटली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

फलटण शहर - चालकास चक्कर आल्यामुळे त्याचा एसटी बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याकडेच्या शेतात पलटी झाल्याची दुर्घटना आज राजाळे गावाजवळ घडली. या अपघातात बसमधील दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर फलटण येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसच्या धडकेत शेताच्या बांधावरील नारळाची झाडे उन्मळून पडली. 

फलटण शहर - चालकास चक्कर आल्यामुळे त्याचा एसटी बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याकडेच्या शेतात पलटी झाल्याची दुर्घटना आज राजाळे गावाजवळ घडली. या अपघातात बसमधील दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर फलटण येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसच्या धडकेत शेताच्या बांधावरील नारळाची झाडे उन्मळून पडली. 

आसू (ता. फलटण) येथे नियमित प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस आज सकाळी पावणेअकरा वाजता फलटणकडे 39 प्रवाशांसह रवाना झाली. राजाळे गावाजवळ निंबाळकर मळा येथे बस आली असता, अचानक बस चालक रामदास सूर्यभाम मेश्राम (वय 36) यांना चक्कर आली. यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली. वेग प्रचंड असल्यामुळे बसच्या धडकेत शेताच्या बांधावरील नारळाची झाडे उन्मळून पडली. बसचे पुढील बाजूने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

या अपघातात बसमधील साळूबाई महादेव जाधव (वय 50), रतन तुकाराम केंगार (60), किसन दिनकर खटके (25), मयूर जालिंधर भंडलकर (18), कैलास नारायण खांडेकर (50), भामाबाई कैलास खांडेकर (48), पूनम आंबदास खांडेकर (28), नानासाहेब तुकाराम देवकाते (66), पूनम महेंद्र देवकाते (25) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढून फलटण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

चालक मेश्राम यांच्या प्रकृतीत प्राथमिक उपचारानंतर सुधारणा झाली असून, त्यांना प्रथमच चक्कर येण्याचा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमी प्रवाशांपैकी किसन दिनकर खटके यांना हाडांच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे, तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी असून, त्यांना कोणताही धोका नसल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. फलटण आगाराकडून घटनास्थळाचा आढावा घेऊन जखमींना एक हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. 

Web Title: satara news st bus phaltan

टॅग्स