साताराः कोयना विभागात मुसळधार पावसास सुरवात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): कोयना विभागात आज (सोमवार) दुपारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली असून, त्याचा परिणाम पाटणच्या आठवडा बाजारावर झाला. कोयनानगरला २२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा ७४.५१ टीएमसी झाला. चोवीस तासात धरणात ३.११ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दोन दिवस पावसाने आज दुपारपर्यंत सुरु होती. मात्र दुपारी एक वाजल्यापासुन पुन्हा मुसळधार पावसास सुरुवात झाली. दुपारी पावसाचा जोर वाढल्याने पाटणच्या आठवडा बाजारासाठी तालुक्यातुन आलेल्यांनी बाजार उरकुन घर गाठण्याचा प्रयत्न केला.

चोवीस तासात कोयनानगरला २२४ (२९१६) मिलीमीटर, नवजाला १८५ (३२४१) व महाबळेश्र्वरला १९४ (२७४८) पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकुण पाणीपातळी २१३५ फुट झाली आहे. पाणी साठ्यात ३.११ टी एम सीने वाढ आहे. पाणीसाठा ७४.५१ टीएमसी झाला आहे.  कोयना जलाशयात प्रतिसेकंद ३४ हजार १८० क्युसेस पाण्याची आवक होत आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news The start of the heavy rain in koyna dam area