चिमुकल्यांचे पंतप्रधानांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सातारा  - "महिलांसह बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न द्या...' असे साकडे साताऱ्यातील छोट्यांनी पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवून आज घातले. अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयातील एक हजार 69 विद्यार्थी व 24 शिक्षकांनी टपालपेटीत पत्र टाकली. 

महात्मा फुले यांच्या जयंती दिनी छोट्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. फुले दांपत्यास "भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च किताब द्यावा, अशी मागणी विविध संस्था, संघटनांच्या वतीने सातत्याने होत आहे. साताऱ्यातील छोट्या विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्रे पाठवून ही मागणी केली. "अण्णासाहेब'मधील शिक्षकांनी विद्यार्थ्याना पोस्टकार्ड घेऊन शाळेत बोलावले होते. सकाळी पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हस्ताक्षरात पत्र लिहिले. त्यांना शालाप्रमुख जयश्री उबाळे, उप प्रमुख अजित साळुंखे, शिक्षक नितीन कदम, अमोल वाघ, कविता भोसले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राजपथावरील शहर टपाल कार्यालयात जाऊन पेटीत पत्रे टाकली. अनेक नागरिक कुतूहलाने पत्र वाचत होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, भारत सरकार 
यांना.. 
स. न. वि. वि. 

स्त्री शिक्षणाचा पाया ज्या दांपत्याने घातला त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने या दांपत्यांस भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, ही आम्हा बालचमूंची आपणास प्रार्थना आहे. 
कळावे. 

Web Title: satara news student send hundreds of letters to the Prime Minister