जिल्ह्यात 38.40 क्विंटल साखरेची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

सातारा - पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे यावर्षी उसाचे टनेज वाढले आहे. परिणामी जिल्ह्याचे साखरेचे उत्पादन वाढणार आहे. आतापर्यंत 14 साखर कारखान्यांनी 34 लाख 97 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 38 लाख 40 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सह्याद्री साखर कारखान्याचा सर्वाधिक 11.91 टक्के इतका साखर उतारा  राहिला आहे. 

जिल्ह्यातील 14 साखर कारखाने यावर्षी गाळप करत आहेत. यामध्ये सहा खासगी आणि आठ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सह्याद्री साखर कारखान्याने सर्वाधिक चार लाख 94 हजार 800 मेट्रिक टन उसाचे गाळप करून पाच लाख 89 हजार 220 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. 

आतापर्यंत सर्व 14 साखर कारखान्यांनी 34 लाख 97 हजार 219 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे 38 लाख 40 हजार 105 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले असले काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही. खासगी कारखान्यांमध्ये "जयवंत शुगर'ला सर्वाधिक 11.80 टक्के साखर उतारा मिळाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने उसाचे टनेज वाढले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक साखर निर्मिती होणार आहे."सह्याद्री'सह श्रीराम, कृष्णा, अजिंक्‍यतारा, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर या कारखान्यांचा सरासरी उतारा 11 टक्के पेक्षा जास्त आहे. 

खासगी सहा कारखान्यांनी 15 लाख 63 हजार 628 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 16 लाख 54 हजार 640 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्या तुलनेत सहकारी आठ साखर कारखान्यांनी 19 लाख 33 हजार 590 मेट्रिक टन ऊस गाळप करून 21 लाख 85 हजार 465 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 

कारखानानिहाय ऊस गाळप 
(कंसात साखर निर्मिती क्विंटलमध्ये) 

अजिंक्‍यतारा : 242280 (268130), रयत : 182570 (200590), खंडाळा तालुका : 104260 (104550), श्रीराम जवाहर : 187690 (208900), कृष्णा : 400030 (476990), किसन वीर भुईंज : 233700 (252060), लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना : 88260 (94025), सह्याद्री : 494800 (589220), न्यू फलटण शुगर : 164636 (170750), जरंडेश्‍वर : 279235 (291160), जयवंत शुगर : 259480(306200), ग्रीन पॉवर शुगर लि. : 239745(265690), स्वराज्य इंडिया ऍग्रो लि. : 250041(242440), शरयू शुगर लि. : 370490 (378400). 

Web Title: satara news sugar factory sugar