एक कोटी सात लाख क्विंटल साखरेचे उत्पादन 

विकास जाधव
मंगळवार, 29 मे 2018

काशीळ, ता. 26 - जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता झाली. जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी 89 लाख 57 हजार 989 मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी सात लाख 52 हजार 330 क्विंटल साखर उत्पादन केले असून, सरासरी 12 टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत "सह्याद्री'ने तर साखर उताऱ्यात "जयवंत शुगर'ने आघाडी ठेवली आहे. 

काशीळ, ता. 26 - जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता झाली. जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी 89 लाख 57 हजार 989 मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी सात लाख 52 हजार 330 क्विंटल साखर उत्पादन केले असून, सरासरी 12 टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत "सह्याद्री'ने तर साखर उताऱ्यात "जयवंत शुगर'ने आघाडी ठेवली आहे. 

जिल्ह्यातील आठ सहकारी आणि सहा खासगी कारखान्यांनी यंदा ऊस गाळप केले आहे. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने हा हंगाम मे महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहापर्यंत सुरू राहिला. या हंगामात सर्वाधिक सह्याद्री कारखान्याने 14 लाख 44 हजार 117 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, 18 लाख दोन हजार 700 क्विंटल साखर उत्पादन केले. साखर उताऱ्यामध्ये जयवंत शुगरने आघाडी घेतली असून, या कारखान्याचा सरासरी उतारा 12.97 टक्के आला आहे. जिल्ह्यात खासगी कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या कारखान्यांकडून गाळपाचे प्रमाण वाढले आहे. सहा खासगी कारखान्यांनी 37 लाख आठ हजार 688 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 43 लाख 26 हजार 805 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच आठ सहकारी कारखान्यांकडून 52 लाख 49 हजार 301 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 64 लाख 25 हजार 525 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. 

साडेसहा महिने हंगाम 

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले होते. ऊस दरातील शाश्‍वतता वाढू लागल्याने जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होते. उद्दिष्टे निश्‍चित ठेवत सर्वच कारखान्यांनी हंगामास सुरवात केली होती. साधारणपणे चार ते पाच महिने हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, क्षेत्रातील वाढीमुळे सर्वच कारखान्यांचा अंदाज चुकला असून, प्रत्येक कारखान्याचा 15 ते 45 दिवस जास्त हंगाम चालला आहे. यामुळे सर्वच काराखान्यांचे गाळप जास्त झाल्याने कधी नव्हे ती एक कोटीपेक्षा जास्त साखर निर्मिती झाली आहे. 

दर घसरणीमुळे हप्ता केला कमी 

जिल्ह्यात ऊस हंगाम सुरळीत चालावा, यासाठी हंगामाच्या सुरवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत एफआरपी व अधिक दोनशे हा फॉर्म्युला मान्य करण्यात आला होता. मात्र, हंगामाच्या मध्यावर साखरेचे दर कमी होऊ लागल्याने पहिल्या हप्त्यातच कारखान्यांनी बिलाची 100 ते 300 रुपये कपात करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळा दर मिळाला आहे. साखरेच्या दरातील झालेली घसरण व ऊस शिल्लक राहील, या भीतीने शेतकऱ्यांनी किती बिल दिले जातेय, याकडे न बघता ऊस तुटण्यास 
प्राधान्य दिले होते. 

यंदाच्या गळीत हंगामातील महत्त्वाचे... 
- सह्याद्री कारखान्याकडून सर्वाधिक गाळप 
- जयवंत शुगर कारखाना साखर उताऱ्यात प्रथम 
- खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप 
- दस घसरणीमुळे एकाच कारखान्याचे शेतकऱ्यांना वेगवेगळे दर 
- सर्वच कारखान्यांचे उद्दिष्टांपेक्षा जास्त ऊस गाळप 

सातारा जिल्ह्यातील ऊस गाळप स्थिती 
कारखाने ........ गाळप (टन) ...साखर उत्पादन (क्विंटल) ..... सरासरी उतारा (टक्के) 
श्रीराम........................3,85,935...................4,48,650...................11.63 
कृष्णा........................11,91,129.................15,19,880................12.76 
किसन वीर.....................7,04,944..................8,36,370................11.86 
बाळासाहेब देसाई.............2,04,157..................2,42,025..................11.85 
सह्याद्री.........................14,44,117................18,02,700................12.48 
अजिंक्‍यतारा...................6,48,616...................7,88,260.................12.15 
रयत............................3,75,000....................4,44,940................11.87खंडाळा......................2,95,403..................3,42,700....................11.60 
न्यू फलटण...................2,83,457...................3,03,250..................10.70 
जरंडेश्वर..........................9,10,930................10,98,570...............12.06 
जयवंत शुगर....................6,14,010...............7,96,600..................12.97 
ग्रीन पॉवर.....................6,02,153..................7,07,100..................11.74 
स्वराज........................4,94,033..................5,03,435...................10.19 
शरयू...........................8,04,105..................9,17,850..................11.41 

Web Title: satara news Sugar production of one crore seven lakh quintals