पवारांमुळेच महाराष्ट्र  दिल्ली तख्तावर - शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सातारा - यशवंतरावांप्रमाणे शरद पवार यांनीही बेरजेचे राजकारण केले. अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढला. महाराष्ट्राचे नाव दिल्लीच्या तख्तावर कोरण्याचे काम त्यांनी केले. शरदरावांसारखे रसायन पुढील काळात राजकारणात मिळेल, असे वाटत नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

सातारा - यशवंतरावांप्रमाणे शरद पवार यांनीही बेरजेचे राजकारण केले. अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढला. महाराष्ट्राचे नाव दिल्लीच्या तख्तावर कोरण्याचे काम त्यांनी केले. शरदरावांसारखे रसायन पुढील काळात राजकारणात मिळेल, असे वाटत नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, ""सातारा जिल्हा अत्यंत कणखर राजकीय नेतृत्व देणारा आहे. शरदराव पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचे अतूट नाते होते. त्यांचा संपूर्ण वारसा श्री. पवारांनी उचलला. शरद पवारांचे संपूर्ण जीवन कष्टातून पुढे आले आहे. मुळात त्यांचा खरा पिंड हा कॉंग्रेसचा आहे; पण काही मतभेद झाले. फुटले, तरी राजकारणात पुढे गेले. यशवंतरावांप्रमाणे त्यांनीही बेरजेचे राजकारण केले. शरद पवारांवर अनेकांनी खरपूस टीका केली. ती ऐकतानाही कानाला बरे वाटत नव्हते. पक्षात राहून टीका करणारे व राजकीय नेत्यांना न शोभणारे वर्तन काहींनी केले. मी साधा पोलिस निरीक्षक होतो; पण मला शरद पवारांनी मोठे केले. राजकीय आणि सामाजिक जीवनाची चालतीबोलती शाळा म्हणजे शरद पवार होय. 1978 ते 80 च्या दशकात पुलोदचे सरकार होते. त्या वेळी कम्युनिस्ट, जनसंघ, शेतकरी कामगार पक्ष, डावे ही सर्व मंडळी एकत्र होती; पण ही सगळी कसरत श्री. पवारांनी पुढे नेली. त्यातूनच आम्ही सर्व काही शिकलो.'' 

राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवीन पिढ्या उभ्या करण्याचे काम पवारांनी केले. हा माणूस साधा नाही. इतकी वर्षे राजकारणात टिकून राहणे सोपे नाही, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ""मनमोहन सिंग यांचा सर्वाधिक विश्‍वास पवारांवर होता. अनेक कठीणप्रसंगी त्यांनी मार्ग काढून दिला. महाराष्ट्राचे नाव दिल्लीच्या तख्तावर पोचविले. आम्ही कुठे गेलो, तरी त्यांच्याविषयी कृतज्ञच राहू. त्याकाळी यशवंतरावांनी बारामतीचा हिरा शोधून काढला जो महाराष्ट्र व देशाला मोठे करू शकेल. ते पवारांनी खरे करून दाखविले.'' 

Web Title: satara news sushilkumar shinde sharad pawar