स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाडला बोंबांबोंब आंदोलन

हेमंत पवार
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सोयाबीन खरेदी केंद्र सुरु न झाल्यास मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळीत शिमगा आंदोलनाचा इशारा

कऱ्हाड (सातारा): सोयाबीन, मुग, उडीद, घेवडा या धान्यांची शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करुन ती खरेदी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील प्रांत कार्यालयासमोर आज (मंगळवार) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दिवाळीपुर्वी खरेदी केंद्र सुरु न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे.

सरकारने सोयाबीन, मुग, उडीद, घेवडा या पिकांची हमीभावाने खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खरेदी केंद्रही सुरु करण्यात आलेली नाहीत. त्यातच व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करणे थांबवले आहे. त्यातच दिवाळी जवळ आल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज असतानाही शेतकऱ्यांना सोयाबीन विकता येत नाही. याचा विचार करुन तातडीने सरकारने बाजार समितीमार्फत खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. मात्र, तरीही केंद्र सुरु झाली नाहीत आणि व्यापाऱ्यांनाही खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने संघटनेच्यावतीने आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर बोंबांबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी हमीभावाने कडधान्य खरेदी न करणाऱ्या व हमी भाव देता येत नसल्याचे कारण पुढे करुन सोयाबीन खरेदीस नकार देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावे, शेतकऱ्यांना अधिकृत सही शिक्यानिशी बिल मिळावे, सोयाबीनचा दर फॅट मशीनवर कमी जास्त न करता थेट हमीभावाने दर मिळावा, घेवड्याला ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा आदि मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अरुण निकम यांना देण्यात आले. यावेळी येत्या दोन दिवसात याची कार्यवाही न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या घरासमोर ऐन दिवाळीत आंदोलन करण्यातयेईल असा इशाराही श्री. नलवडे यांना आज दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news swabhimani shetkari sanghatana in karad