तरडगाव आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी ठोकले टाळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

तरडगाव - येथील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी आज टाळा ठोकला. येथे बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नसल्याने वेळोवेळी तक्रार करूनही जिल्हा प्रशासन गंभीर नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. 

या आरोग्य केंद्रात बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नाहीत. जे आहेत, त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, याकडे कोणीही लक्ष देत नाही. 

आजच सर्पदंश झालेला एक रुग्ण उपचारासाठी आला होता. मात्र, डॉक्‍टर नसल्याने त्याची मोठी गैरसोय झाली. असे प्रकार वारंवार घडत आहेत. येथील कर्मचारीही उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही लोकांचे म्हणणे आहे. "आयएसओ' मानांकनप्राप्त असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची अशी सेवा होत असेल, तर काय करायचे, असा प्रश्‍न सामान्य नागरिक विचारत आहेत. दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच तरडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तरीही प्रश्‍न का सुटत नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: satara news taradgaon