शिक्षक बदल्यांत आता रोस्टरची आडकाठी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सातारा - गत फेब्रुवारीमध्ये शिक्षक बदलीची सुरू झालेली प्रक्रिया वर्षानंतरही सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिक्षकांच्या बदल्या याच शैक्षणिक वर्षात ऑनलाइन पद्धतीने करण्यावर ग्रामविकास विभाग अडून बसले आहेत. शिक्षक विभागातील अडचणी कमी होत नसल्याने या विभागाच्या अडखत-अडखत सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे शिक्षक बदल्या लांबणीवर पडत आहेत. 

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सर्वसाधारण (सुगम) आणि अवघड (दुर्गम) वर्गातील शाळांत ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी ही प्रक्रिया बऱ्याचदा न्यायालयीत प्रक्रियेतून गेल्यानंतर त्यात बदल होत गेले. शिवाय, सातत्याने बदली प्रक्रियेत सुधारणांचे आदेश येत राहिल्याने ही प्रक्रिया लांबत गेली. दिवाळीदरम्यान दुसरे सत्र सुरू होताना बदल्या केल्यास शैक्षणिक नुकसान होणार असल्याने ही बदली प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. 

मात्र, शिक्षण विभागाची संचमान्यता रखडल्याने बदली प्रक्रियेला मुहूर्त लागला नाही. आता फेब्रुवारी महिना निम्मा झाला तरीही काही जिल्हा परिषदांची बिंदू नामावली (रोष्टर) पूर्ण नसल्याने आंतरजिल्हा बदलीचा विषय खोळंबला आहे. आंतरजिल्हा बदल्या होत नसल्याने जिल्ह्यांतर्गत बदली होत नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठांचे म्हणणे आहे.

सततच्या बदलत्या प्रक्रियेने शिक्षक त्रस्त
बदली प्रक्रियेसंदर्भा त सातत्याने बदल होत असल्याने शिक्षकांनाही ही प्रक्रिया किचकट वाटू लागली आहे. सातत्याने नवनवीन, गुंतागुंतीची परिपत्रके निघत आहेत. त्यामुळे माहिती भरणेही शिक्षकांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातूनही नाराजी व्यक्‍त केली जात आहेत. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाने ताळमेळ साधून शैक्षणिक वर्षापूर्वी बदली प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

Web Title: satara news teacher transfer roster