कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत

सचिन शिंदे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

वनरक्षक अर्चना शिंदे, बी. जी. खटावकर यांनी तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी कासवाचा पंचनामा करून ताब्यात घेतले. कासावाचा मृत्यू कशाने झाला. ते शवविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

कऱ्हाड : तालुक्यातील साबळवाडी येथे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या गाव विहीरीत कासव मृत अवस्थेत आढळले. ते कासव अठरा नख्यांचे आहे.

सुमारे पंधरा वर्षापासून विहीरीत होते. कासव नेमके कशामुळे मृत झाले शवविच्छेदनानंतर समजणार आहे. वनरक्षक अर्चना शिंदे, बी. जी. खटावकर यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सदरची घटना आज उघडकीस आली. साबळवाडी येथील गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सुमारे पंधरा वर्षापासून असलेले कासव मृत अवस्थेत पडून होते. ते विहिरीच्या पाण्यावर तरंगताना युवकांना दिसले. त्यावेळी कासव मृत अवस्थेत पाण्यात राहिल्याने पाणी दुषित होवू नये. या कारणाने युवकांनी त्याला विहिरी बाहेर काढले. त्यानंतर नागरीकांनी वन विभागास कळवले.

वनरक्षक अर्चना शिंदे, बी. जी. खटावकर यांनी तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी कासवाचा पंचनामा करून ताब्यात घेतले. कासावाचा मृत्यू कशाने झाला. ते शवविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. उंब्रज येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नरूटे यांच्याकडे नेण्यात आले. मात्र कारण समजू शकले नाही.

Web Title: Satara news tortoise dead in well at karhad