प्रशिक्षणांतून महिलांचे सक्षमीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने मुली, महिलांना प्रशिक्षित करण्याबरोबर घरगुती कामात सहकार्य करण्यासाठी एमएससीआयटी, टायपिंग, ज्युदो-कराटेचे शिक्षण देण्याचा निर्णय यावर्षीही कायम ठेवला आहे. त्यासाठी चालू आर्थिक वर्षात ४२ लाखांची तरतूद केली असून, घरघंटी देण्यासाठीही तब्बल २९ लाख ५० हजारांची तरतूद ठेवली आहे. 

महिलांचे सक्षमीकरण करणे, शालेय मुली, युवतींमध्ये जनजागृती करण्याबरोबर त्यांना मदत करण्याचे काम महिला व बालकल्याण विभाग पार पाडते. यावर्षीही महिला व युवतींना एमएससीआयटी आणि टायपिंग कोर्सवर या विभागाने भर दिला आहे. नोकरी, व्यवसायातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संगणकीय ज्ञानाची आवश्‍यकता असल्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे. गतवर्षीच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पात सातवी ते बारावीमधील मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, बारावी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्यासाठी २८ लाख, तर चालू वर्षासाठी २० लाख रुपयांची, मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी गतवर्षीच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पात २९.४० लाख, तर २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. ३२ लाख रुपयांतून २०१७-१८ मध्ये पीठाची गिरणी (घरघंटी) महिलांना देण्यात आली होती. आता २०१८-१९ मध्ये त्यासाठी २९ लाख ५० हजारांची तरतूद केली आहे. पाचवी ते बारावीतील मुलींसाठी चालू आर्थिक वर्षात २६ लाख ५० हजार रुपयांतून सायकली दिल्या असून, पुढील वर्षांसाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. २०१७-१८ च्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकात दोन कोटी २० लाख, तर चालू आर्थिक वर्षासाठी एक कोटी २१ लाखांची तरतूद केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी दिली.

आकडे बोलतात...
प्रशिक्षणार्थी संख्या (२०१७-१८)
८३२ - एमएससीआयटी कोर्स
६९५ - टायपिंग कोर्स

Web Title: satara news training women Empowerment