सातारकरांसाठी आज शैक्षणिक संधीचा खजिना खुला होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी-बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यास उपयुक्त

नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी-बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यास उपयुक्त

सातारा - शैक्षणिक संधीचा खजिना उद्या (शुक्रवार) सातारकरांसाठी खुला होणार आहे. नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी- बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी विविध संधी काय आहेत, यासंबंधी सखोल माहिती विद्यार्थी व पालकांनी देणाऱ्या सकाळ एज्यु ॲडव्हांटेज करिअर प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवार) सायंकाळी चार वाजता सैनिक स्कूलच्या प्राचार्या ग्रुप कॅप्टन मनीषा मिश्रा यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पोवई नाक्‍यावरील रजतसागर मंगल कार्यालयात केले जाणार आहे.

सकाळ माध्यम समूहाने सकाळ एज्यु ॲडव्हांटेज करिअर प्रदर्शन आयोजित केले आहे. उद्यापासून (शुक्रवार) चार जूनअखेर पोवई नाक्‍यावरील रजतसागर मंगल कार्यालयात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पुणे येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमीतर्फे पोवई नाक्‍यावरील रजतसागर मंगल कार्यालयात होणाऱ्या या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे. नानासाहेब महाडिक टेक्‍निकल कॅंपस (डिग्री अँड डिप्लोमा), पेठनाका हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. 

एकाच छताखाली सांगलीसह कोल्हापूर आणि पुण्या- मुंबईतील दर्जेदार शिक्षण संस्थांचा यामध्ये समावेश असेल. दहावी- बारावीची परीक्षा झाली. गुणांची यादी हाती येईल. क्षमता कळेल, पुढे काय असा भलामोठा प्रश्‍न. कोणते करिअर करायचे, या प्रश्‍नासाठी एज्यु ॲडव्हांटेज प्रदर्शन आहे.

मनातील साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे येथे मिळतील. मग करिअरच्या वाटा सोप्या होतील. तज्ज्ञांचाही मौलिक सल्ला व्याख्यानांच्या माध्यमातून दिला जाईल. नर्सरी ते पदवीपर्यंत, तसेच विविध कोर्सेसमध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे,

या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनाची परंपरा सकाळने काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला दर वर्षी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शन विद्यार्थ्यांना ‘फॉर राईट चॉईस ऑन राईट टाईम’च ठरणार आहे. प्रदर्शनात करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधींबाबत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, सॉफ्टवेअर, फार्मसी, एमबीए, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ॲबॅकस, अनिमेशन, आदी व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्टॉल असतील. इतर विविध विद्याशाखांसाठी विविध उपयुक्त दर्जेदार क्‍लासेसचाही समावेश असेल. शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बॅंकांचीही माहिती दिली जाणार आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या अशा प्रदर्शनात हजारो विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद मिळाला. यंदा प्रथमच लहान मुलांच्या इंग्लिश माध्यम स्कूलचा समावेश करण्यात आला आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. 
प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभास क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे प्रा. एन. ए. शेख, पेठ (ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडिक टेक्‍निकल कॅंपसचे प्राचार्य मोहन जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया....
वसीम शेख, (विद्यार्थी ) : या प्रदर्शनातून मला करियरच्या संधीची पूर्ण माहिती मिळाली, तसेच विविध क्षेत्रातील नवे अभ्यासक्रम, कोर्स आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली. साहजिकच मला पुढील करिअरची दिशा निश्‍चित करणे सुलभ झाले.

ऋषिकेश जाधव (विद्यार्थी) ः पदवीनंतर पुढे काय करायचे असा माझ्यापुढे प्रश्‍न होता. मात्र, गेल्या वर्षी ‘सकाळ’च्या या प्रदर्शनात माझ्या सर्व शंका आणि अडचणी दूर झाल्या. विविध महाविद्यालये, शिक्षण संस्थांतील अभ्यासक्रम, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीच्या संधीही मला कळाल्या. प्रदर्शनातील तज्ज्ञांची व्याख्यानेही यासाठी मला उपयुक्त ठरली.

मोफत वायफाय
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात रिलायन्स जिओच्या  वतीने मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वांना ऑनलाइन व अपडेट माहिती मिळणार आहे. संबंधित शैक्षणिक संस्थांच्या संकेत स्थळावरील माहिती प्रदर्शनस्थळीच मिळणार आहे. अशी सुविधा उपलब्ध करून देणारे हे एकमेव प्रदर्शन आहे. 

प्रदर्शनात काय पाहाल...
दर्जेदार शैक्षणिक संस्थांची माहिती
तज्ज्ञांची व्याख्याने, समुपदेशन
खासगी क्‍लासेसची माहिती 
स्पर्धा परीक्षा केंद्रांची ओळख
इंग्लिश माध्यम स्कूलची माहिती 
प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश 
सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले
अधिक माहितीसाठी प्रदीप राऊत (मोबाईल ९९२३२३३९९९), राहुल पवार (९९२२९१३३४५) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रदर्शनात सहभागी संस्था...
क्रिएटिव्ह ॲकॅडमी पुणे, नानासाहेब महाडिक टेक्‍निकल कॅंपस पेठ (जि. सांगली), संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोल्हापूर, समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट सातारा, नॅशनल कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियरिंग, सातारा, एकेज कॉमर्स ॲकॅडमी, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, डीकेटीई टेक्‍सटाईल अँड इंजिनियरिंग, इचलकरंजी, स्मार्ट स्टार्ट ॲकॅडमी, सातारा, दिशा ॲकॅडमी, वाई, क्रेझी क्रिएशन, सातारा, कृषिगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सातारा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.

Web Title: satara news Treasures of educational opportunities will be open