मुंबईहून तीस लाख रुपयांची रोकड घेऊन जाणारे ताब्यात

विलास साळूंखे
बुधवार, 10 जानेवारी 2018

भुईंज (सातारा) ः मुंबईहून तीस लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांकडून रकमेबाबत योग्य स्पष्टीकरण देता न आल्याने भुईंज पोलिसांनी सदरची रक्कम ताब्यात घेऊन रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात दिली. नितीन केशवचंद उपाध्याय (वय 27, रा. मिरारोड ईस्ट मुबंई) व सुरज राकेश चौबे (वय 24, रा. नालासोपारा मुंबई) यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील व वाईचे उपाविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या आदेशान्वय सोमवारी (ता. 8) रात्री उशिरा एका वाहनातून मोठी रोकड जाणार असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाल्याने सहायक पोलिस निरिक्षक दुर्गानाथ साळी, रेखा दुधभाते, हवालदार धायगुडे, धनाजी फडतरे, श्री. गार्डी, श्री. आवळे यांच्या पथकाने आनेवाडी टोलनाक्‍यावर वाहनांची तपासणी करण्यास प्रारंभ केला.

एका वाहन चालकाने तपासणी करताना पोलिसांच्या प्रश्‍नांवर उडवाउडवीची उत्तरे देण्यास प्रारंभ केला. यामुळे सहायक पोलिस निरिक्षक श्री. साळी यांनी संबंधितांना भुईंज पोलिस ठाण्यात नेले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 29 लाख 72 हजार शंभर रुपये आढळून आले. याबाबत संबंधिताना विचारले असता त्यांना रकमेबाबतचे योग्य स्पष्टीकरण देता आले नाही.

यानंतर पोलिसांनी सहायक संचालक आयकर विभाग (कोल्हापूर) यांना कळवून सदरचे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले. त्याबाबत श्री. विजय नटके यांनी सदरच्या रक्कमेबाबत खात्री करुन संबंधितावर आयकर बुडविल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे नमूद केले.

Web Title: satara news two arrested for taking cash of rs 30 lakh