सातारा: तारळी नदीत पोहण्यासाठी गेलेले बापलेक गेले वाहून

संतोष चव्हाण
बुधवार, 21 मार्च 2018

प्रवीण श्रीरंग बाचल( वय ३८) व त्यांचा मुलगा स्वप्नील (९ ) अशी नदीत बुडालेल्या बाप लेकांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत दोघांचे नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : शिरगाव येथील तारळी नदीत पोहण्यासाठी गेलेले बापलेक वाहून गेले. मंगळवारी सायंकाळी घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

प्रवीण श्रीरंग बाचल( वय ३८) व त्यांचा मुलगा स्वप्नील (९ ) अशी नदीत बुडालेल्या बाप लेकांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत दोघांचे नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

पोलिस व घटनास्थळावरील माहितीनुसार, शिरगाव येथील प्रवीण बाचल त्यांच्या ९ वर्षांचा मुलगा स्वप्निल यास नियमितपणे पोहायला शिकवण्यासाठी घेऊन जातात. रविवारी सायंकाळी सहा वाजता गावाशेजारी नदीकाठी ते स्वप्नीलला घेऊन गेले होते. मात्र पोहताना मुलगा बुडत आल्याचे  लक्षात येताच प्रवीण यांनी त्यास वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र स्वप्नीलने वडिलांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. हे दृश्य एका ग्रामस्थाने प्रत्यक्षदर्शी पाहिल्यानंतर त्याने सदरची घटना गावात सांगितली. त्यानंतर ग्रामस्थ व उंब्रज पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन रात्री उशिरापर्यंत त्यांची शोध मोहीम तारळी नदी सुरू होती.

Web Title: Satara news two drown in river