उदयनराजेंवर आणखी एक गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सातारा/भुईंज - आनेवाडी टोलनाक्‍यावर बेकायदेशीर जमाव जमवून टोल वसुलीस विरोध केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 150 जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थक आजी-माजी नगरसेवकांसह चौघांनी आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. धुमश्‍चक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यात पहिल्यांदा अटक केलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली तर, काल अटक केलेल्या एकाला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यावरून झालेल्या राड्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आनेवाडी टोलनाक्‍यावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी खासदार उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्‍य मोहिते, मुरलीधर भोसले, गुन्या सदाशिव आवळे, राजू गोडसे, सनी भोसले यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत हवालदार धनाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे. कोजागरीच्या रात्री सुरूची बंगल्यासमोर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी खासदार व आमदार समर्थकांवर खुनाचा प्रयत्न व "आर्म ऍक्‍ट'नुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या फिर्यादीवरूनही खुनाच्या प्रयत्नाचा व शासकीय कामात अडथळा आणून शासकीय अधिकाऱ्यास दुखापत केल्याचाही गुन्हा दाखल आहे. धुमश्‍चक्रीप्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा अटक केलेल्या शेखर चिकणे, चेतन सोळंकी, प्रतीक शिंदे, नितीन सोडमिसे या चौघांची पोलिस कोठडीची मुदत आज संपली. त्यांच्यासह काल अटक केलेल्या केदार राजेशिर्के याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. पहिल्या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत न्यायालयाने एक दिवसाने वाढविली. तर, केदारला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

आजी-माजी नगरसेवकांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 
"सुरूची'समोर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेकजण साताऱ्यातून पसार झाले आहेत. नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार व फिरोज पठाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले. त्यावर शुक्रवारी (ता. 13) सुनावणी होणार आहे.

Web Title: satara news Udayan Raje