संशयितांच्या "लुंगी डान्स'मुळे पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सातारा - कोजागरी पौर्णिमेदिवशीच्या धुमश्‍चक्री प्रकरणातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक संशयितांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये "लुंगी डान्स' या गाण्यावर नृत्य करत काल (ता. 21) धुडगूस घातला. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी नेमणुकीवर असणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. संबंधित संशयित हे रुग्ण नाहीत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 

कैद्यांच्या वॉर्डमधील "लुंगी डान्स' सोशल मीडियावर आज व्हायरल झाल्याने शहर पोलिसांची झोप उडाली. त्यांनी सकाळी कैद्यांच्या वॉर्डची झडती घेतली. त्याठिकाणी मोबाईल फोन, कॅरम आदी वस्तू सापडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरुची बंगल्यासमोर झालेल्या धुमश्‍चक्रीमुळे खासदार व आमदार गटातील कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील काही कार्यकर्ते "प्रकृती अस्वास्थ्या'चे कारण पुढे करून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यानच्या काळात दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले. तीन दिवसांपूर्वी आमदार गटातील कार्यकर्त्यांना जामीन झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संशयितांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यातूनच अतिउत्साही संशयितांनी मोठ्या आवाजात गाणं वाजवत नृत्य केले. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. "प्रकृती अस्वास्थ्या'चे कारण पुढे करणारे संशयित धमाल मूडमध्ये कसे काय नाचतात? असा सवाल उपस्थित झाला. पोलिसांच्या एका पथकाने कैद्यांच्या वॉर्डची झडती घेतली. त्यात दोन मोबाईल, पॉवर बॅंक, कॅरम व सिगारेटची पाकिटे सापडली. घटनास्थळाचा पंचनामा करून त्या वस्तू जप्त करण्यात आल्या. 

या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला आहे. पोलिस अधिकारी हा अहवाल न्यायालयात सादर करतील. कैद्यांच्या वॉर्डच्या बंदोबस्तासाठी एक हवालदार व तीन पोलिस कर्मचारी तैनात होते. त्यांचीही चौकशी करण्यात येत असून, दोषींवर कारवाई केली जाईल. 
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, सातारा 

Web Title: satara news Udayanraje Bhosale Sandeep Patil Superintendent of Police