I LOVE U ALL... उदयनराजेंचा मैत्रीदिन तृतीयपंथियांसमवेत!

रविवार, 6 ऑगस्ट 2017

देवाने आपल्याला थोडी बुध्दी जास्त दिली म्हणून आपण माणूस म्हणून जगतो. या सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकरिता जे जे करावे लागेल ते केले जाईल, कुठेही कमी पडणार नाही

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि साताऱ्यातील सामान्य जनतेचे नाते इतके दृढ आहे की, कोणीही कार्यक्रमास बोलावले तर ते आवर्जून उपस्थित राहतात. रविवारी त्यांनी तृतीयपंथियांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारत त्यांच्यासमवेत मैत्रीदिन साजरा केला. या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी त्यांना गराडा पडला होता. 

आर. डी. भोसले आणि सुनिता भोसले यांनी "नाते रक्ताच्या पलिकडचे, निखळ मैत्रीचे' ही थिम घेऊन मैत्रीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर "त्यांना आपले म्हणा...' या तृतीयपंथीयांसोबतच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सुनील काटकर, रवी साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, आपण सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. या राष्ट्रगीतातील एक एक शब्दाचे मनापासून अनुकरण करायला पाहिजे. आपल्याला जगायचा अधिकार आहे, तसा तो या लोकांनाही का नाही ? आपण या लोकांना जवळ केले नाही तर आपल्यात व इतर प्राण्यांत फरक काय ? देवाने आपल्याला थोडी बुध्दी जास्त दिली म्हणून आपण माणूस म्हणून जगतो. या सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकरिता जे जे करावे लागेल ते केले जाईल, कुठेही कमी पडणार नाही. एवढपण मी देखणा नाही, या सर्वांपुढे मनोगत व्यक्त करतोय. पण एकच सांगतो आय लव्ह यू ऑल...! 

Web Title: satara news: udayanraje celebrates birthday