कऱ्हाड : विराज मोहिते यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

सचिन शिंदे
रविवार, 25 मार्च 2018

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे चुलत भाऊ आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांचे ते चुलते आहेत. यशंवतराव मोहिते व जयनंतराव भोसले यांचे बंधू हिंदूराव मोहिते यांचे विराज चिंरजीव आहेत. घटनेमुळे मोहिते, भोसले यांच्यावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. रेठऱ्यासह कृष्णा काठ परिसरावर शोककळा पसरली आहे.

कऱ्हाड : ज्येष्ठ विचारवंत (कै.) यशवंतराव मोहिते व कृष्णा उद्योग समुहाचे (कै) जयवंतराव भोसले यांचे रेठरे बुद्रूक येथील विराज हिंदूराव मोहिते (वय, 38) चुलत पुतणे यांनी स्वत:ला गोळी घालून घेवून आत्महत्या केली. रेठरे बुद्रूक येथ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हेवाडी नावाच्या शिवारात घटना घडली. त्यांनी त्यांच्या राहत्या घरात रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे चुलत भाऊ आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांचे ते चुलते आहेत. यशंवतराव मोहिते व जयनंतराव भोसले यांचे बंधू हिंदूराव मोहिते यांचे विराज चिंरजीव आहेत. घटनेमुळे मोहिते, भोसले यांच्यावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. रेठऱ्यासह कृष्णा काठ परिसरावर शोककळा पसरली आहे.

विराज यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही. अनेक दिवसांपासून ते निराश होते. त्यातूनच हा प्रकार झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. तालुका पोलिसात त्याची नोंद झाली आहे. आदित्य हिंदुराव मोहिते यांनी पोलिसात माहिती दिली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

Web Title: Satara news Viraj Mohite suicide in Karhad

टॅग्स