पळून पळून ते कोठे जाणार?

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सातारा ः कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साताऱ्यात खासदार व आमदार गटांत झालेल्या मारामारी प्रकरणी आज (मंगळवार) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ""आम्ही सर्वांना समान भूमिकेतून पाहत आहोत. काही जण साताऱ्यातून गायब झाले आहेत, असे तुम्ही म्हणत आहात. पण, पळून पळून ते कोठे जाणार ? पोलिसांची पथके राज्यात रवाना झाली आहेत.

आरोपींची लोकेशन्स, मोबाईल लोकेशन्स ट्रेस होत आहेत. आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. कायद्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. तपासात निष्पन्न होणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सातारा शहर हे शातंताप्रिय आहे. मध्यमवर्गीय तसेच पेन्शनरांचे हे गाव आहे. या ठिकाणी कायदाचे राज्य देणे हे सर्व प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही नांगरे-पाटील यांनी नमूद केले. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news vishwas nangare patil and police