सातारा पोलिस दलाला बावीस पदके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सातारा - राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघात सातारा जिल्हा पोलिस दलातील ३४ खेळाडूंनी सहभागी घेतला होता. या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पाच सुवर्ण, सात रजत व दहा कास्य पदके अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत.

सातारा - राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघात सातारा जिल्हा पोलिस दलातील ३४ खेळाडूंनी सहभागी घेतला होता. या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पाच सुवर्ण, सात रजत व दहा कास्य पदके अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत.

राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा मुंबईत झाली. या स्पर्धेत सातारा जिल्हा पोलिस दलातील २२ पुरुष व १२ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विविध क्रीडा प्रकारांत एकूण २२ पदके या खेळाडूंनी प्राप्त केली आहेत. पदके मिळविणाऱ्या खेळाडूंची नावे अशी : सुवर्णपदक विजेते : अर्जन शिरतोडे (भालाफेक), सुनील सपकाळ (वेटलिफ्टिंग), असिम महात (हॉकी), नजराणा देसाई (कुस्ती), माधवी साळुंखे (वेटलिफ्टिंग). 

रजत पदक विजेते - मोहसीन मोमीन (हातोडा फेक), किरण जाधव (उंच उडी), देवानंद बर्गे (जलतरण), प्रीती तालटे (ज्यूदो), राणी कुदळे (कुस्ती), सुप्रिया जगदाळे (कुस्ती), पूजन जाधव (व्हॉलिबॉल).

कास्य पदक विजेते - संतोष त्रिंबके (ज्यूदो), गणेश चव्हाण (बॉक्‍सिंग), अमित पवार (बॉक्‍सिंग), अजयराज देशमुख (बॉक्‍सिंग), रणजित कुंभार (चारशे मीटर रिले), सुप्रिया जगदाळे (ज्यूदो), देवानंद बर्गे (जलतरण). सर्व यशस्वी खेळाडूंना पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, गृह विभागाच्या पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिमंडल पोलिस उपअधीक्षक नंदा पराजे, राखीव पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ साबळे व स्पोर्ट इन्चार्ज शशिकांत गोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: satara news western maharashtra news award police team