नगरसेवक बाळू खंदारेला अखेर साताऱ्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सातारा - सुरुची बंगल्यासमोर झालेल्या धुमश्‍चक्री प्रकरणात पोलिसांना चार महिने गुंगारा देणारा संशयित, नगरसेवक बाळासाहेब खंदारे आज पोलिसांच्या हाती लागला. त्याला आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरटीओ ऑफिस परिसरातून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

सुरुची समोर थेट फायरिंगसह जाळपोळ, तोडफोड झाल्यानंतर याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोन गुन्ह्यांत बाळू खंदारे संशयित आहे. या गुन्ह्यांमध्ये तो फरार असतानाच त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खासगी सावकारीचाही गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलिसांना तो याही गुन्ह्यामध्ये हवा होता. पोलिसांनी त्याचा माग काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यामध्ये कधी मुंबई, तर कधी हैदराबाद, तर कधी पुणे असे त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळत होते.

बुधवारी सायंकाळी बाळू खंदारे हा वकिलांना भेटण्यासाठी साताऱ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. सायंकाळी सात वाजता आरटीओ कार्यालयाच्या परिसरात वकिलांना भेटण्यासाठी आलेल्या बाळू खंदारेला पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कारवाई सुरू होती.

Web Title: satara news western maharashtra news corporator balu khandare arrested