वाठार स्टेशन परिसरात मोबाईलद्वारे दारूविक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

वाठार स्टेशन - वाठार स्टेशन परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूधंदे सुरू असून, येथील युवकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजरोसपणे होत असलेली दारूविक्री थांबवण्याकडे पोलिसांनी पाठ फिरवली असून, त्यांनी गांधारीची भूमिका घेतली असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

वाठार पोलिस ठाण्यांतर्गत उत्तर कोरेगावमधील ४७ गावांचा समावेश होतो. न्यायालयाच्या आदेशानुसार ठाण्यांतर्गत बहुतांश दारू दुकाने बंद झालेली असली तरी या दुकानदारांकडून सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईलद्वारे दारूचे बुकिंग करून तसेच चोरटी दारूविक्री केली जात आहे. दारूविक्रेत्यांनी बेरोजगार मुलांना हाताशी धरून मोबाईलद्वारे दारूचे बुकिंग करून जादा पैशांनी या मुलांकडून जागापोच दारूविक्री केली जात आहे. समाजात बोकाळलेली व्यसनाधिनता, पालकांना अंधारात ठेवून भौतिक सुखाच्या आहारी गेलेली तरुणाई बेधुंद झाली आहे. त्याला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत ठरलेली दिसत आहे. दारू धंद्यांबरोबर मटका, जुगार या भागात सुरू असून, अनेक संसार या जुगारामुळे उद्‌ध्वस्त झाले आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी येथील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी भागातील एका दारू दुकानातून तब्बल चार लाखांची दारू जप्त करून एक प्रकारे येथील  अवैध व्यवसायिकांच्या मुसक्‍या आवळळ्या होत्या. 

मात्र, श्री. निकम यांची बदली झाल्याने येथील अवैध व्यवसायिकांनी पुन्हा एकदा डोके वर काढून या भागात थैमान घातले आहे. हे व्यवसाय बंद करण्याचे मोठे आव्हान येथे नव्याने रूजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्यासमोर ठाकले आहे.

Web Title: satara news wine liquor mobile