कोयना नदीत उडी मारलेल्या विवाहीतेचा सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सौ. सारिका विजय रावते (वय 32 वर्षे, रा. शनिवार पेठ) असे त्याचे नान आहे. शुक्रवारी दुपारी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस कोयना नदीत तो मृतदेह तरंगताना आढळला. संबंधित विवाहितेच्या पती, सासू, सासऱ्यासह दोन नंणदांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी, यासाठी शहर पोलीस ठाण्यात विवाहीतेच्या नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता.

कऱ्हाड :  दोन दिवसांपूर्वी येथील जुन्या कोयना पुलावरून कोयना नदीत उडी मारलेल्या विवाहीतेचा मृतदेह शुक्रवारी दुपारनंतर सापडला.

सौ. सारिका विजय रावते (वय 32 वर्षे, रा. शनिवार पेठ) असे त्याचे नान आहे. शुक्रवारी दुपारी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस कोयना नदीत तो मृतदेह तरंगताना आढळला. संबंधित विवाहितेच्या पती, सासू, सासऱ्यासह दोन नंणदांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी, यासाठी शहर पोलीस ठाण्यात विवाहीतेच्या नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले  असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : येथील शनिवार पेठेत विजय रावते त्यांची पत्नी सौ. सारिका रावते, दोन लहान मुली व  आई-वडीलसह राहतात. सौ. रावते  दोन दिवसांपूर्वी घरातून अचानक निघून गेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता. सौ. सारिका यांचे माहेर लेगंरे (ता. खानापूर, जि. सांगली) येथील असून त्यांच्या माहेरकडील लोकही त्यांचा शोध घेत होते. त्या वेळी दोन दिवसापूर्वी कोयना नदीवरील जुन्या पुलावरून महिलेने उडी मारल्याची माहिती काही मासेमारी करणार्‍यांनी दिली..त्यानुसार सौ. सारिका यांचा कोयना नदीत शोध घेण्याचे काम सुरू होते.

त्यावेळी शुक्रवारी दुपारी येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस कोयना नदीत सौ. सारिका यांचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी व नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्याची ओळख पटवल्यानंतर तो  शवविच्छेदनासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. ती कारवाई सुरू असतानाच सौ. सारिका यांचे माहेरकडील नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी सौ. सरिका यांचे पती विजय, तीचे सासू, सासऱ्यासह तीच्या दोन नणंदाच्या त्रासाने सौ. सारिकाने आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली. यासाठी त्यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. त्यानुसार गुन्हा दाखल प्रक्रीया सुरू होती.

Web Title: Satara news women body found in koyna river

टॅग्स