‘झिरो पेंडन्सी’ला सन्मानाची झालर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सातारा - ‘झिरो पेंडन्सी’चा अजेंड्यावर सातारा जिल्हा परिषदेने यात बाजी मारली आहे. चक्‍क ‘दिवाळी’पूर्वीप्रमाणे सफाई मोहीम राबवत सुमारे सात टनाहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावली. आता त्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.

विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी महसूल पाठोपाठ जिल्हा परिषदांनाही ‘झिरो पेंडन्सी’चा ‘अजेंडा’ दिला. सातारा जिल्हा परिषदेत दोन महिन्यांपूर्वीच सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागात शून्य प्रलंबिता (झिरो पेंडन्सी) व अभिलेख वर्गीकरणाचे काम सुरू केले होते. श्री. दळवी यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदांना हे काम राबविण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. देशमुख यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये हे काम अजेंड्यावर ठेवले आहे. त्याला अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे यांच्यासह पंचायत समित्यांच्या सभापतींचे सहकार्य मिळत आहे.  जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांचे शून्य प्रलंबिता, अभिलेख वर्गीकरणासाठी सहा पद्धतीने काम करण्यात आले. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे सात टनाहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. ते काम अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी डॉ. देशमुख सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सर्व विभागांपुढे अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचीही पाहणी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेत दोन स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार करण्यात आल्या आहेत. 

ही मोहीम अधिक गतीने पुढे जावी, यासाठी प्रत्येक विभागातील ‘झिरो पेंडन्सी’चे काम उत्कृष्टरीत्या करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय डॉ. देशमुख यांनी घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत जिल्हा परिषदेतील, तर तद्‌नंतर पंचायत समित्यांमधील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही प्रक्रिया २० वर्षांपासून प्रथमच राबविण्यात आल्याने कर्मचारी, नागरिकही समाधान व्यक्‍त करत आहेत.

Web Title: satara news Zero pendancy zp