नऊ गावांत झाली साथरोगांची लागण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सातारा - जिल्ह्याच्या विविध भागांत जानेवारीपासून चिकुनगुण्या, डेंगी या साथरोगांत वाढ होत आहे. नऊ गावांत या साथरोगांची लागण होऊन त्यात २४८ ग्रामस्थ ग्रस्त झाले. सहा गावांमध्ये चिकुनगुण्या, तर तीन गावांत डेंगीची साथी उद्‌भवली. त्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना राबवून उपचारही केले आहेत. भविष्यात साथीचे रोग उद्‌भवू नयेत, यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यात आल्याने गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, कॉलरा, विषमज्वरसारखे जलजन्य आजार पसरतात. या कालावधीत डासांची पैदास होण्यासाठी भरपूर पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने डासांची निर्मिती होते. त्यामुळे डासांमार्फत पसरणाऱ्या हिवताप, डेंगी, चिकुनगुण्या, हत्तीरोग, जपानी मेंदुज्वर यासारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. जानेवारीपासून कोरेगाव, फलटण, ढोरेशीत डेंगीची लागण होऊन त्यात ८७ ग्रामस्थ बाधित झाले होते. इतर ठिकाणी चिकुनगुण्याची लागण होऊन त्यात १६१ जण ग्रासले गेले. या गावांतील पाणी नमुने घेण्यात आल्यानंतर त्यात ५८ पाणी नुमने दूषित निघाले. 

गाव व साथरोगाची कारणे  
सणबूर, मोरगिरी (ता. पाटण), गणेशवाडी (ता. कऱ्हाड), ओहळी (ता. वाई), कोरेगाव (ता. कोरेगाव), म्हसवड (ता. माण), ढोरेशी (ता. पाटण), फलटण, मराठवाडी (ता. पाटण) येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांनी पाणी साठवून ठेवले. मुंबईहून ये- जा करणारे रुग्ण असल्याने एडिस डास, डास आळी घनतेत वाढ होऊन चिकुनगुण्या, डेंगीचा उद्रेक झाला. 
 
जलजन्य रोग नियंत्रणासाठी
पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांत दैनंदिन टीसीएल, मेडिक्‍लोर वापरून शुद्धीकरण करावे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइप, व्हॉल्व्हला गळती असल्यास त्वरित काढावी. ग्रामपंचायतीमार्फत ओटी सनियंत्रण करावे. टीसीएलचा पुरेसा साठा करावा. जलस्तोत्रांच्या भोवतालचा १०० फुटांचा परिसर स्वच्छ ठेवावा, पिण्यास अयोग्य पाणी स्तोत्रावर असुरक्षिततेचा फलक लावावा. गटारे वाहती करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी.

कीटकजन्य रोग नियंत्रणासाठी...
पिण्याचे पाणी साठवणूक करीत असलेली भांडी झाकून ठेवावीत.
पाण्याच्या साठ्यांत डासांच्या आळ्या खाणारे गप्पी मासे सोडावेत.
आठवड्यातून एकदा पाणीसाठ्यांची सर्व भांडी स्वच्छ करावीत.
घराभोवतालचे निरुपयोगी भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी.
शौचालयाच्या सेफ्टीक टॅंकच्या व्हेंट पाइपला जाळी बसावी.
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. 
कुलर, फ्रिजचा ड्रीप पॅन नियमित स्वच्छ करावा.

Web Title: satara news zp