जिल्ह्यात 286 पंचायतींना मिळणार हक्काची इमारत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सातारा - स्वातंत्र्याची 70 उलटली तरीही राज्यातील चार हजार 252, तर जिल्ह्यातील 286 ग्रामपंचायतींना स्वत:ची स्वतंत्र इमारत नाही. मात्र, आता शासनाने अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयीन इमारत बांधता यावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, दुर्गम भागातील ग्रामपंचायतींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

जिल्ह्यात एक हजार 494 ग्रामपंचायती असून, त्यातील शहरी भागालगतच्या तसेच लोकसंख्येने मोठ्या, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची ग्रामपंचायत इमारत अथवा ग्रामसचिवालय आहेत, ज्या खेड्यांची लोकसंख्या कमी आहे, उत्पन्न कमी आहे, राजकीयदृष्ट्या "सुदृढ' नाहीत, अतिदुर्गम भागात आहेत, अशा तब्बल 286 ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:चे कार्यालय नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या तरी घरात, भाड्याच्या खोलीत, समाजमंदिरात अथवा मंदिरात चालत होता. या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 12 लाख आणि एक हजार ते दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. या निधीपैकी 90 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून, दहा टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्‍यक आहे. या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावरदेखील इमारत उभारता येणार आहे. तसेच दोन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे. 

पाटण, जावळीत सर्वाधिक संख्या  
तालुकानिहाय इमारत नसलेल्या ग्रामपंचायती-सातारा : 46, कोरेगाव : 14, खटाव : आठ, माण : 18, फलटण : 20, खंडाळा : तीन, वाई : 12, जावळी : 50, महाबळेश्‍वर : 21, कऱ्हाड : 45, पाटण : 52.

Web Title: satara news zp