वयोवृद्ध महिलेच्या पायावरून गेले बसचे चाक

संदिप कदम 
मंगळवार, 27 मार्च 2018

फलटण शहर (जि.सातारा) -  फलटण एसटी स्टॅन्डमधून बाहेर पडणाऱ्या एसटीचे मागचे चाक वयोवृद्ध महिलेच्या पायावरून गेल्यामुळे त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. गुडघ्या खालील पायाचा भाग पूर्ण मोडला असून, या वृद्ध महिलेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोदाबाई अर्जुन कांबळे (वय ७०,रा. आसू) या वृद्ध महिलेच्या उजव्या पायावरून आगाराबाहेर पडणाऱ्या बसचे (एम एच २० बीएल ३२४९) मागील चाक गेले. यामध्ये महिलेचा गुडघ्यापर्यंतचा पाय निकामी झाला. घटना घडताच तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

फलटण शहरात वाढते अतिक्रमण व अतिक्रमण काढण्यास कुचकामी ठरत असणारी शासकीय यंत्रणा यामुळे शहरात अपघाताचे वाढत आहे. आता आमखी किती बळी गेल्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न होणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

Web Title: satara old woman bus accident