तेच मुद्दे आणि तेच गुद्दे 

तेच मुद्दे आणि तेच गुद्दे 

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जाहीरनामे तयार केले आहेत. मूलभूत सुविधांसोबतच स्वच्छ प्रशासन, शाळांची गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न, कृषी पर्यटन आणि सोलार सिटी या मुद्यांना सर्वच पक्षांनी प्राधान्य दिले आहे. मतदारांवर आपल्या जाहीरनाम्यांतून आश्‍वासनांचीच खैरात केली आहे. कोणाचा जाहीरनामा मतदारांच्या गळी उतरणार, त्यावर या निवडणुकीचे यश अवलंबून राहणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबतच भाजप आणि शिवसेनाही रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होतील. निवडणुकीच्या प्रचारात प्रभाव टाकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापले जाहीरनामे व वचननामे तयार केले आहेत; पण एकाही जाहीरनाम्यात मतदारांवर प्रभाव पडेल, असे मुद्दे दिसत नाहीत. त्यामुळे नेते व उमेदवार तेच तेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस : 
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प 
गावनिहाय नवीन व्यायामशाळा बांधणे 
शालेय शिक्षणात आधुनिकता आणणे 
पंतप्रधान आवास योजनेतून सहा हजार घरे 
योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची उभारणी 
पाणी योजना व चांगल्या रस्त्यांचे जाळे 
बचतगटांना उद्योगांचे प्रशिक्षण 
मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावणार 
गाव तेथे ग्रंथालय चळवळ राबविणार 

कॉंग्रेस : 
सौर अभ्यासिका प्रत्येक गावात 
युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्रे 
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनास प्राधान्य 
पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र 
सेवा हमी कायद्याची प्रभाव अंमलबजावणी 
महाराजस्व अभियानातून शाळांत जातीचे दाखले देणार 
ग्रामपंचायतींचे कामकज ऑनलाइन करणार 
गावोगावी वनराई बंधाऱ्यांची व्यापक मोहीम 
मधुमेह, रक्तदान उपचार शिबिरांची मोहीम राबविणार 
जेनेरिक औषधे उपलब्धतेसाठी केंद्रे सुरू करणार 

भाजप : 
अपूर्ण धरणांची कामे पूर्णत्वास नेणार 
सर्व पाणी योजनांना प्रधान्य 
जलयुक्तमधून सर्व गावे जलस्वयंपूर्ण करणे 
रस्त्यांचे सक्षम जाळे निर्माण करणे 
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी 
जिल्हा परिषद शाळांचा शिक्षणस्तर उंचावणे 
शासकीय कामकाजात पारदर्शकता 
प्रत्येक गाव इंटरनेटच्या माध्यमातून जोडणार 
कृषी पर्यटनाला चालना देणार 
कचऱ्यातून खतनिर्मितीवर भर देणार 

शिवसेना : 
मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावणार 
कृषी पर्यटनाला चालना देणे 
तरुणांच्या स्वयंरोजगार निर्मितीवर भर 
सर्व शासकीय कामांसाठी एक खिडकी 
(कै.) बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करणार 
24 तास आरोग्य सुविधा सर्व केंद्रात 
सोलार सिटी बनविण्याचा प्रयत्न 
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणार 
कृषी व समाजकल्याण विभागाला भरीव निधीची तरतूद 
जिल्हा प्रशासन आपल्या दारी प्रत्येक तालुक्‍यात राबविणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com