चला देश सेवेचा विडा उचलूयांत ! काेराेना याेद्धा बनण्याकरिताची ही आहे पात्रता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

सातपुते यांनी केलेल्या ट्विटला फाॅलाेअर्सनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सुमारे तीन तासांत (दुपारी एक वाजेपर्यंत) 33 जणांनी रिट्विट तर 201 जणांनी लाईक करुन काेराेना याेद्धा म्हणून नियमांचे पालन करु असे आश्वासित केले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सातारकरांसह जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. परंतु काेराेना विरुद्धची लढाई अजून संपली नाही. आगामी काळात ती अधिक नियंत्रणात आणावी लागणार आहे. स्वतः च आणि कुटुंबाचे रक्षण हीच देशसेवा समजून कार्यरत असणारे साताराचे पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज(रविवार) ट्विटच्या माध्यमातून काेराेना याेद्धांचे (नागरीक) प्रबाेधन केले आहे. मी सुद्धा काेराेना याेद्धा, हे माझे कर्तव्य आहे. काेराेना याेद्धा बनण्याकरिता आपल्याकडे ही पात्रता हवी असे सातपुते यांनी ट्विट केले आहे.

तेजस्वी सातपुते म्हणतात काेराेना याेद्धा अनावश्यक घराबाहेर पडत नाही. बाहेर जाणे अतिशय आवश्यक असल्यास मास्कचा वापर करताे व मास्कची याेग्य प्रकारे विल्हेवाट लावताे. साेशल डिस्टंस पाळताे व अनावश्यक स्पर्श करणे टाळताे. घरातील वयाेवृद्ध आणि बालकांना घराबाहेर पडू देत नाही. काेठेही थूंकत नाही. स्वतः नियमाचे पालन करताे व इष्ट मित्र, शेजारी, कुटुंबियांना देखील नियमांचे पालन करण्यास भाग पाडताे. काेराेना याेद्धा देशाप्रती व समाजाप्रती आपली जबाबदारी आेळखताे.

सातपुते यांनी केलेल्या ट्विटला फाॅलाेअर्सनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सुमारे तीन तासांत (दुपारी एक वाजेपर्यंत) 33 जणांनी रिट्विट तर 201 जणांनी लाईक करुन काेराेना याेद्धा म्हणून नियमांचे पालन करु असे आश्वासित केले आहे.

सातारची आरोग्य कर्मचारी (नर्स) ठणठणीत
 
दरम्यान कराड वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात येथील एका आरोग्य कर्मचारी ज्यांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले हाेते तसेच कराड येथील सह्यादी रुग्णालय येथील दाेघांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील दाेघांचे असे पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या सर्वांना रुग्णालयातुन आज (रविवार) घरी सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. याबराेबरच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64 असे एकूण 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे  बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 11 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा  क्लिक करा

क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 75 असे एकूण 83 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.

उशिरा का हाेईना शाळांसाठी आली दिलासादायक बातमी

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच...

गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी

एकतर्फी प्रेम अन् गहिवरले आई वडील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara SP Tejaswi Satpute Tweets About Coronafighter

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: