नशीब बलवत्तर : मायलेकींसह तिघे वाचले

नशीब बलवत्तर : मायलेकींसह तिघे वाचले

शिखर शिंगणापूर (जि.सातारा) : येथील तानाजी बबन सावर्डे यांच्या घरामध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत घरांमधील वस्तूंचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. 

येथील सावर्डे यांच्या घरात हिराचंद काटकर राहत होते. मंगळवारी (ता.19) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा घरात स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. नशीब बलवत्तर म्हणून प्रसंगावधान राखत घरातील मायलेकींसह सर्वजण बाहेर पडले. शिंगणापूर पोलिस ठाण्याचे अमोल चांगण, पोलिस पाटील संतोष बोराटे, गावातील संजय पवार, अर्जुन पवार, वीरभद्र कावडे, जय मोरे, अविनाश रोकडे, शुभम हजारे, कर्चे, मदने आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घराचे पत्रे काढून आग विझविण्यासाठी विशेष मदत केली. परंतु, घरांमधील जीवनावश्‍यक वस्तूंसह टीव्ही, फ्रीज, दिवाण, धान्य आदी सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
 
काटकर कुटुंब हे गरीब असून, रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाउनमुळे परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यात या स्फोटाने घरातील साहित्य जळून गेले. या साहित्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. पोलिस ठाण्याचे अमोल चांगण, संतोष बोराटे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यास मदत केली. गावकामगार तलाठी एम. एम. चव्हाण यांनी पंचनामा केला. 

नवीन शेगडीची मदत
 
दहिवडीतील एचपी गॅसचे वितरक अजय तोडकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून नवीन शेगडीची मदत केली. कंपनीकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच जीवनावश्‍यक वस्तूंचीही मदत देण्याचे जाहीर केले. 

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला

दहिवडीत गावठी मिळेना अन् बॉयलरचा वधारला भाव

सातारा : पावसाळा लांबल्यास पाणीटंचाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com