साताऱ्यात दोन राजांची ताकद विभागणार, पण कशी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

राजांना मानणारे निम्मे कार्यकर्ते भाजपसोबत जाणार आहेत. तर निम्मे कार्यकर्ते शरद पवारांना मानणारे असल्याने ते राष्ट्रवादीसोबतच राहणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव, वाई, कऱ्हाड उत्तरमधील भाजप की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दोन राजांची ताकद मिळणार यावर या मतदारसंघातील गणिते अवलंबून आहेत.

सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघात ताकद होती. ही ताकद राष्ट्रवादीसोबत होते. पण आता ते दोघेही भाजपमध्ये गेल्याने ही ताकद विभागणार आहे.

राजांना मानणारे निम्मे कार्यकर्ते भाजपसोबत जाणार आहेत. तर निम्मे कार्यकर्ते शरद पवारांना मानणारे असल्याने ते राष्ट्रवादीसोबतच राहणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव, वाई, कऱ्हाड उत्तरमधील भाजप की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दोन राजांची ताकद मिळणार यावर या मतदारसंघातील गणिते अवलंबून आहेत.

साताऱ्यातील दोन्ही राजांची ताकद आजपर्यंत राष्ट्रवादीच्या पाठीशी होती. सध्या सातारा तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे पाच सदस्य राष्ट्रवादीचे तर भाजपचे दोन आणि
उदयनराजे भोसले यांच्या साता विकास आघाडीचे तीन सदस्य आहेत. तसेच सातारा पंचायत समितीत अकरा सदस्य हे शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे आणि नऊ सदस्य हे उदयनराजेंना मानणारे आहेत. तसेच जावलीत दोन राष्ट्रवादीचे तर एक भाजपचा सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. तसेच जावली पंचायत समितीत सहा सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. पैकी किती सदस्य त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष व सभापतीच्या आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. तरीही दोन्ही राजांचे जिल्हा परिषद व जावली आणि सातारा पंचायत समितीवर वर्चस्व आजही कायम आहे. या सदस्यांनी भाजप मध्ये प्रवेश केलेला नसला तरी निवडणुकीत हे सदस्य भाजपचे काम करणार की राष्ट्रवादीसोबत राहणार याबाबत सध्यातरी निश्‍चित झालेले नाही.

दोन्हीराजांनी अद्यापतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना कोणतीही सूचना केलेली नाही. तरीही निवडणुकीत आतून राजांना मानणारे भाजपसोबतच राहणार आहेत. त्यामुळे निकालानंतरच कोणी कोणाला मदत केली हे स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sataras Udyanraje Bhosale and Shivendraraje Bhosale enters BJP