पुन्हा माझा बळी देऊ नका - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूर दक्षिणमधून लढण्यास मी तयार आहे. दोन महिन्यांत कार्यकर्ते किती जीवाचे रान करतात, यावरच उमेदवारीचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूर दक्षिणमधून लढण्यास मी तयार आहे. दोन महिन्यांत कार्यकर्ते किती जीवाचे रान करतात, यावरच उमेदवारीचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा ड्रीम वर्ल्ड येथे झाला. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘विकासकामाच्या जोरावर २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली. चांगले वातावरण असल्याने सर्वच गाफील राहिलो आणि पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या जोरावर ज्या नेत्याने १४ महिने जनतेला वेठीस धरले, त्याचा पराभव करून आमदारकी मिळवली. लोकसभेला ज्यांना मदत केली त्यांनीही फसवले. जी मंडळी फसवाफसवीचे राजकारण करत आहेत, त्यांच्याविरोधात लढण्यास मी पुन्हा तयार आहे. मात्र, ही निवडणूक लढण्यापूर्वी सर्वच कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

माझा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत मला विषाची परीक्षा करायला लावू नका, असे सांगत कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कार्यक्रम घर टू घर पोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार करण्याची शपथ घेतली.

मेळाव्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील, बाजार समिती संचालक विलास साठे, शेतकरी संघाचे संचालक विजय चौगुले, विजय पाटील, राजू शिंदे, सचिन पाटील, संदीप मोहिते, संजय पाटील, श्रीपती पुंदीकर, राजू वळीवडेकर आदींचे मनोगत झाले.

या वेळी करवीरचे उपसभापती सागर पाटील, मनीषा वास्कर, प्रदीप झांबरे, शाहू कारखान्याचे संचालक मारुती निगवे, सुनील पवार, सचिन पाटील, युवराज गवळी, बाबासो माळी, एकनाथ पाटील, प्रताप चंदवाणी आदी उपस्थित होते.

Web Title: Satej Patil comment